
ठाणे : ठाणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. शहापूर शहरातील R.S.दमानिया स्कूलमधील विद्यार्थिनींसोबत लाजस्पद व केविलवाणा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. शहापूर शहरातील नामांकित R.S.दमानिया शाळेत मुलींना विवस्त्र करत त्यांची तपासणी केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप निर्माण झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.