
भारत आणि इंग्लंड संघात अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील तिसरा सामन्यात चुरस पाहायला मिळण्याची सर्वांनाच अपेक्षा आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी झालेली आहे. अशात मालिकेत आघाडी घेत वरचढ ठरण्यासाठी दोन्ही संघांसाठी क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर होणारा तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरणार आहे.