Gold
Gold 
मुंबई

सोन्याला आलाय 'भाव'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, चीन-अमेरिका व्यापारी संघर्ष, फेडरल रिझर्व्हचे पतधोरण, या घडामोडींमुळे भविष्यात सोने वधारण्याचा अंदाज बांधत गुरुवारी (ता. २०) सराफ आणि बड्या व्यावसायिकांनी सोने-चांदीची मोठी खरेदी केली. मागणी वाढल्याने दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ३४ हजार २० रुपयांपर्यंत वाढला. मुंबईत सोने प्रति दहा ग्रॅमला ६९८ रुपयांनी महागले असून, सोन्याचा दर ३३ हजार ५५९ रुपये आहे. कमोडिटी एक्‍सचेंजमध्येही सोने २.५ टक्‍क्‍यांनी वधारले असून, ३३ हजार ९०० रुपयांवर बंद झाले. या तेजीने ग्राहकांचे डोळे दिपवले असून, जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव पाच वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोचला आहे.

लग्नसराईचा हंगाम जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सराफा बाजारात फारशी वर्दळ नाही. मात्र, जागतिक घडामोडींचा थेट परिणाम बाजारातील किमतींवर होत असल्याने मोठे सराफ आणि आयातदारांनी मौल्यवान धातूच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. जागतिक बाजारपेठेत गुरुवारी सोन्याचा भाव प्रति औंस १ हजार ३८६ डॉलरपर्यंत वधारला. सिंगापूरमध्ये तो १ हजार ३९४.११ डॉलरपर्यंत गेला. गेल्या पाच वर्षांतील सोन्याचा हा उच्चांकी स्तर आहे. यापूर्वी २०१३ मध्ये सोने १ हजार ४०० डॉलरपर्यंत वधारले होते.

दिवसअखेर दिल्लीत सोने २८० रुपयांनी वधारून ३३ हजार ८५० रुपयांवर, तर शुद्ध सोने ३४ हजार २० रुपयांवर बंद झाले. मुंबईतील सराफा बाजारात सोने प्रति दहा ग्रॅमला ३३ हजार ५५९ रुपयांवर बंद झाले. यामध्ये ६९८ रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव एक किलोमागे ७९५ रुपयांनी वधारून ३७ हजार ९५५ रुपयांवर स्थिरावला.

मुंबईतील दर
शुद्ध सोने - ३३६९४ (+७०१) 
स्टॅंडर्ड सोने - ३३,५५९ (+६९८) 
चांदी (एक किलो) - ३७,९५५ (+७९५) 

दिल्लीतील दर 
शुद्ध सोने - ३४,०२० (+२८०) 
स्टॅंडर्ड सोने - ३३,८५० (+२८०) 
चांदी (एक किलो) - ३९,०६० (+७१०)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT