मुंबई

गोल्फ कोर्स डोंगरावर पर्यटकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघरमधील गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरातून   झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यात मनसोक्त भिजून पर्यटकांनी पावसाचा आनंद घेतला. रविवार सुट्टीचा दिवस आणि सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस चालू होता. गोल्फ कोर्स लगत असलेल्या डोंगरातून झिरपणाऱ्या पावसाच्या धारा आणि धामोला नाल्यात  भिजण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. 

पनवेल वन विभाग आणि खारघर पोलिसांनी पांडवकडा धबधब्यावर बंदी घातल्याने नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून आलेल्या पर्यटकांनी गोल्फ कोर्स लगत असलेल्या डोंगरात पर्यटकांची रीघ लागली होती. विशेषतः खारघर सेक्टर सहा गोल्फ कोर्स शेजारी सिडकोने ड्रायविंग रेंज उभारले आहे. वाहने उभी करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुरेशी जागा आहे. शिवाय डोंगर आणि नाल्यात भिजताना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे  मुला बाळासह पर्यटकांनी रीघ लागली होती.

''गोल्फ कोर्सलगत ड्रायव्हिंग रेंज येथे वाहने उभी करण्यासाठी जागा आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि डोंगरातून वाहणाऱ्या छोट्या धबधब्याचा आनंद घेताना मजा आली.''

- राजश्री नायक, सीबीडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT