Good manners of parents Shrikant Shinde or Aditya Thackeray Sakal
मुंबई

Shrikant Shinde : संस्कार खूप मॅटर करतात; आमच्यावर आई-वडिलांचे चांगले संस्कार, श्रीकांत शिंदेचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्यांचे जसे संस्कार असतात तसे ते टिका करतात. संस्कार खूप मॅटर करतात.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्यांचे जसे संस्कार असतात तसे ते टिका करतात. संस्कार खूप मॅटर करतात.

त्यांच्या आई वडिलांचे संस्कार त्यांच्यावरती तसे झाले असतील म्हणून असे शब्द वापरतात अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी टिका केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील साकेत कॉलेजमध्ये शिक्षकांसोबत बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करत त्यांचा समाचार घेतला आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले, जसे ज्यांचे संस्कार असतात तसे ते टीका करत असतात. त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार त्यांच्यावरती तसे झालेले आहेत. म्हणून खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द आपली

पात्रता नसताना वापरतात. संस्कार सर्वात महत्त्वाचे असतात. आमच्यावरती स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे, बाळासाहेबांचे आणि आमच्या आई-वडिलांचे संस्कार आहेत. आम्ही कोणाला शिव्या शाप, खालचे शब्द वापरू शकत नाही.

त्यांच्यावरती ज्यांचे संस्कार झालेत त्यांना देखील जाऊन विचारलं पाहिजे असे कसे संस्कार केले ? असे म्हणत खासदार शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT