gun firing
gun firing sakal
मुंबई

Dombivali Crime : माजी नगरसेवकाच्या चालकाच्या घरावर गोळीबार; सुदैवाने लहान मुलगी बचावली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याणमधील माजी नगरसेवकाच्या चालकाच्या घरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छतावरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने छतावरूनच घरात हा गोळी बार केला आहे. छताचा पत्रा छेदून ही गोळी आरपार गेल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दिनेश हरी जाधव (वय 37) असे तक्रारदार चालकाचे नाव असून कल्याण पश्चिमेकडे असलेल्या चिकणघर मधील होलीक्राॅस शाळेजवळच्या प्रगतीनगर चाळीत कुटुंबियांसह राहतात. ते कल्याणमधील एका माजी नगरसेवकाच्या गाडीवर चालक म्हणून नोकरी करतात.

रविवारी रात्री अज्ञात इसमाने बंदुकीतून गोळीबार करून घराचे नुकसान केले आहे. गोळीबाराची घटना घडली तेव्हा तक्रारदार वाहन चालकाची लहान मुलगी घरात खेळत होती, मात्र सुदैवाने ती वाचली. या गोळीबाराच्या घटनेत घरातील कोणीही सदस्य जखमी झाला नाही.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तक्रारदार वाहनचालक दिनेश जाधव आपल्या गाळ्यातील भाडोत्री मोहन राम यांच्या सोबत रात्री साडेआठच्या सुमारास गप्पा मारत होते. त्यावेळी दिनेश यांची मुलगी मोठ्याने ओरडत दिनेश यांच्याजवळ आली आणि आपल्या घरात मोठा स्फोट झाला आहे, असे सांगितले. दिनेश आणि त्यांच्या साथीदारांनी तात्काळ घराकडे धाव घेतली.

दिनेशची पत्नी दीपा हिने त्यांना माहिती दिली की घराच्या छपरावरून मोठ्याने आवाज होऊन बंदुकीची गोळी वेगाने घरात पडली. घरात पडताना घराचे छताचा पत्रा आणि छताच्या पंख्याची पात वाकली आहे, असे पतीला सांगितले. तक्रारदाराने तात्काळ घराच्या छतावर जाऊन पाहणी केली, त्यावेळी छतावरील पत्र्याला बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे छिद्र पडल्याचे आढळले.

गोळीबाराची घटना घडली त्यावेळी दिनेश यांची लहान मुलगी देवस्वी ही बेडरूममध्ये खेळत होती. सुदैवाने खेळताना ती खोलीच्या एका बाजुला होती. अन्यथा बंदुकीची गोळी अथवा छताचा तुटलेला पत्रा डोक्यात पडून ती गंभीर जखमी झाली असती. दिनेश यांनी ही माहिती तात्काळ महात्मा फुले चौक पोलिसांना दिली.

पोलिसांनी पंचनामा करून बंदुकीची गोळी ताब्यात घेतली आहे. परिसरातून ही बंदुकीची गोळी कोठुन आली याचा शोध पोलिसांननी सुरू केला आहे. राजकीय वा वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला आहे का ? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT