मुंबई

कामत-देवरा गटाचे ऐक्‍य 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मुंबई काँग्रेसला लागलेले गटबाजीचे लागलेले ग्रहण सुटण्याचे संकेत आहेत. दिवंगत गुरुदास कामत व दिवंगत मुरली देवरा यांच्यातील गटबाजी हे मुंबई काँग्रेसचे वैशिष्ट्य मानले जात होते. मात्र, आता इतिहासात पहिल्यांदाच कामत-देवरा गटाचे ऐक्‍य झाले असून, दोन्ही गटाच्या नेत्यांनी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात एकोपा केला आहे. 

संजय निरुपम यांच्या एकहाती व मनमानी कारभाराने या दोन्ही गटांतील नेते अस्वस्थ आहेत. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्‍वासू निरुपम मुंबई काँग्रेसला कुमकुवत करत असल्याचा आरोप या दोन्ही गटांतील नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे या नेत्यांनी निरुपम यांची तक्रार केली आहे. निरुपम यांच्या वाढत्या वर्चस्ववादी भूमिकेमुळे कामत गटातील काही नेत्यांनी या अगोदरच भाजपसोबत घरोबा केला आहे, तर कामत यांच्या निधनाने इतर सर्वच काँग्रेसला राम राम करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. पण, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासह जनार्दन चांदूरकर, भाई जगताप, कृपाशंकर सिंह, नसीम खान, जावेद खान यांनी एकत्र येत मुंबई काँग्रेसमधील गटबाजी मोडून काढण्याचा निर्धार केला आहे. 

निरुपम-फडणवीस भेटीने चर्चेला उधाण
संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उत्तर भारतीय समाजाच्या समस्यांसाठी भेट घेतली. या भेटीमागे निरुपम यांनी काँग्रेसला गर्भित इशारा दिल्याचे मानले जात आहे. निरुपम यांच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार असल्याने त्यांनी हा स्टंट केल्याची टीका पक्षांतर्गत विरोधकांमध्ये सुरू आहे. भाजपने सध्या दारे सताड उघडी ठेवली असल्याने या भेटीबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT