मुंबई

क्रुर कृत्याची परिसीमा! बॅगेत आढळला महिलेचा अर्धवट मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : महिलांवर अत्याचार करून हत्येच्या घटनांमुळे देशात मोठा जनक्षोभ उसळला असताना कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर रविवारी(ता.8) पहाटे एका बॅगेत महिलेचा अर्धवट मृतदेह आढळला. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके तयार केली असून सीसी टीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू आहे. 

कल्याण रेल्वेस्थानकाजवळील रस्त्यावर रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका बॅगेतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कल्याण रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता बॅगेत प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा कंबरेखालील अर्धवट मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या रुक्‍मिणीबाई रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, सीसी टीव्ही फुटेज आणि रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार पथकांद्वारे तपासाला सुरुवात केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी टिटवाळा रेल्वेस्थानकामध्ये एक व्यक्ती बॅग घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर साधारणतः 21 मिनिटांनी ती लोकल कल्याण रेल्वेस्थानकात आली. त्यानंतर ती व्यक्‍ती कल्याण रेल्वेस्थानकात उतरून कल्याण पश्‍चिमेला एका रिक्षात बसली. त्याने रिक्षाचालकास गोवे टोल नाक्‍याकडे घेऊन जाण्यास सांगितले. दरम्यान, दुर्गंधी आल्याने रिक्षाचालकाने त्या व्यक्तीला बॅगेत काय आहे, असे विचारत बॅग उघडून दाखवण्यास सांगितले. तेव्हा इतर रिक्षाचालकही तेथे जमा झाले. त्यामुळे त्या व्यक्तीने व्होडाफोन गॅलरीसमोर बॅग फेकून कल्याण रेल्वेस्थानकात पळ काढला. 

तपासासाठी पोलिसांची चार पथके 
याबाबत रिक्षाचालकांनी त्वरित या घटनेची माहिती कल्याण एसटी डेपोमधील बिट मार्शल यांना दिली. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता बॅगेत अंदाजे 20 ते 25 वयोगटातील महिलेचा कंबरेखालील अर्धवट मृतदेह आढळून आला. बिट मार्शलने या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविताच रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून सीसी टीव्ही फुटेज आणि रिक्षाचालकांच्या माहितीनुसार पोलिसांनी चार पथकांमार्फत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कुणाला काही माहिती असल्यास महात्मा फुले पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT