मुंबई

वाशीत फेरीवाल्यांचे पुन्हा बस्तान

सकाळवृत्तसेवा

ऐरोली - नवी मुंबईचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीला फेरीवाल्यांचे ग्रहण लागले आहे. गजबजलेल्या भागातही त्यांनी बस्तान मांडले आहे. त्यांनी पदपथ नव्हे, तर रस्त्यांवरही कब्जा केला असल्याने पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

वाशी सेक्‍टर ९, १०, १५, १६ आणि १७ हा विभाग नेहमीच गजबजलेला असतो. त्याचाच फायदा घेण्यासाठी फेरीवाल्यांनी पदपथावर व रस्त्यावर आपले बस्तान मांडलेले असते. भाजीवाले, फळ विक्रेते, किरकोळ गृहोपयोगी वस्तू विकणारे, कपडे, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ अशा विविध वस्तू विकणाऱ्या या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना गर्दीतून वाट काढणे मुश्‍कील होते. तसेच वाहतूक खोळंबा होतो. पालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे असताना त्यांनी बेकायदा फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई केली होती. त्यामुळे पदपथ व रस्ते हे फेरीवालामुक्त झाले होते. पालिकेने ऑक्‍टोबरमध्येही बेकायदा फरीवाले आणि दुकानांसमोरील मोकळ्या जागांचा ताबा घेणाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु त्यानंतर कारवाई थंडावली. त्याचाच फायदा घेऊन फेरीवाले पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. अनेक फेरीवाले रस्त्यावर कचरा टाकून  देतात. 

रस्त्यावर व पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येते. तरीही फेरीवाले बसत असतील तर माहिती घेऊन कारवाई करू.
- महेंद्रसिंग ठोके, वाशी विभाग अधिकारी तथा उपआयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT