मुंबई

एचडीएफसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या 

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - मुंबईतील कमला मिल परिसरातून बेपत्ता झालेले एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी (वय 38) यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधांतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोपरखैरणेतील बोनकोडे येथून एकास अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, याप्रकरणी आणखी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

सरफराज शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संघवी यांच्या हत्येत आणखी तिघांचा सहभाग असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यांनीच संघवी यांची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपल्यावर दिली होती. त्यानुसार हाजीमलंग मार्गावर मृतदेह फेकल्याचेही सरफराजने पोलिसांना सांगितले. दरम्यान, मुंबई पोलिसांनी अमित, रईस आणि पंकज या तिघांना ताब्यात घेतले आहे. हाजीमलंग परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत संघवी यांच्या मृतदेहाची शोधाशोध सुरू होती. 

संघवी हे कमला मिल येथील एचडीएफसीच्या कार्यालयात कार्यरत होते. बुधवारी रात्री 8 वाजता ते कार्यालयातून निघाले; मात्र घरी पोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात संघवी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना गुरुवारी दुपारी कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतच्या निर्जनस्थळी संघवी यांची मोटार सापडली. त्यात चाकू आणि रक्ताचे डाग आढळले होते. 

"ती' महिला कोण? 
संशयित सरफराज हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. नवी मुंबईतील बोनकोडे गावात वर्षभरापूर्वी तो राहायला आला. तीन वर्षांपूर्वी मुंबईतील कमला मिलमध्ये तो फॅब्रिकेशनचे काम करायचा. त्यानंतर तो काही दिवस ओला कॅब चालवत होता; मात्र चार महिन्यांपूर्वी पुन्हा तो कमला मिलमध्ये कामाला लागला होता. तेथे त्याला भेटलेल्या एका महिलेने संघवी यांचा फोटो दाखवून हत्येची सुपारी दिली, असे सरफराजने पोलिसांना सांगितले. पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT