Chest pain
Chest pain sakal media
मुंबई

तरुणांमध्ये स्तनाच्या तक्रारींत चार पटीने वाढ; जाणून घ्या कारणे

भाग्यश्री भुवड

मुंबई, : तरुणांमध्ये स्तनाच्या म्हणजेच गायनॅकोमॅस्टियाच्या तक्रारींमध्ये (Gynecomastia Complaints) चार पटींनी वाढ झाली आहे. पुरुषांच्या स्तनाच्या (Male chest problems) ग्रंथीचा विस्तार झाल्याने ही समस्या उद्भवते. पूर्वी मुंबईच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital) दर वर्षी गायनॅकोमॅस्टियाचे ८ ते १० रुग्ण (Gynecomastia Patients) दाखल व्हायचे, पण आता ही संख्या दरवर्षी किमान ४० रुग्णांवर पोहोचली आहे. विशेषत: जीम (GYM) व त्यानंतर चिकनच्या अतिसेवनामुळे (chicken eating Addiction) तरुणांमध्ये हा त्रास वाढत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

केईएम रुग्णालयाच्या ब्रेस्ट सर्जरी विभाग प्रमुख आणि जनरल सर्जरी विभागाच्या प्राध्यापक डॉ. शिल्पा राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांमध्ये गायनॅकोमॅस्टियाच्या तक्रारी गेल्या १० वर्षांत किमान ४०० पटीने वाढली आहे. यात १६ ते २४ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. पूर्वी दरवर्षी फक्त ८ ते १० रुग्ण येत होते. आता हे प्रमाण चार पटीने वाढले आहे. या आजारामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. विशेषत: ही समस्या उद्भवणारे तरुण आपल्या दिसण्यावर, शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेत असतात; मात्र योग्य तो सल्ला न घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये गायनॅकोमॅस्टियाच्या समस्या वाढल्या आहेत.

त्यामुळे या तरुणांना कोणत्याही सल्ल्याशिवाय जीमनंतर घेतली जाणारे सप्लीमेंट्स खाऊ नये. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच योग्य व्यायाम व आहार घ्यावा, असेही डाॅ. राव यांनी सांगितले.
दरम्यान, गायनॅकोमॅस्टियामध्येही तीन टप्पे असतात. बरेचसे तरुण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर उपचारासाठी येतात. पहिल्या टप्प्यात आजाराची काही लक्षणे केवळ दिसून येतात. दुसऱ्या टप्प्यात जडपणा जाणवायला लागतो आणि तिसऱ्या टप्प्यात लांबून बघितल्यावरही तरुणाला हा आजार झाल्याचे दिसून येते. एकदा पुरुषांच्या स्तनात या आजाराचे ब्रेस्ट टिश्यू तयार झाले की शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असतो, असेही डॉ. शिल्पा राव यांनी सांगितले.

"अयोग्य जीवनशैली व चुकीच्या आहारामुळे अनेक तरुणांमध्ये स्तनाच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे तरुणांनी शरीरसौष्ठवासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करावा व त्यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा."
- डॉ. शिल्पा राव, ब्रेस्ट सर्जरी विभाग प्रमुख, केईएम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: तो डिनर प्लॅन केला नसता तर ? पुण्यातील पोर्शे अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं

Cannes Film Festival: अन् त्याच्यासाठी दहा मिनिटं झाला टाळ्यांचा कडकडाट! 'पंचायत'च्या बिनोदचा कान चित्रपट महोत्सवात डंका

उमेदवाराला विरोध म्हणून विद्यमान खासदाराने मतदान सुद्धा केले नाही! भाजपने पाठवली कारणे दाखवा नोटीस

Pune Porsche Car Accident: पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अन्यथा...; संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

HSC Result 2024: बारावीच्या निकालात मुलींचा डंका, कोकणातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या संपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT