BMC: 2500 कोटींहून अधिक खर्चाचे प्रस्ताव पटलावर; विकासाचा बाण सुटला

BMC
BMCsakal media

मुंबई : पुढल्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पाश्वभूमीवर विकासाचा बाण (Development plan) सुटला. सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या (Sthayi samiti) बैठकीत तब्बल 2 हजार 500 कोटीहून अधिक खर्चाचे प्रस्ताव (Twenty five hundred crore expenses proposal) मुंबई महापालिका प्रशासनाने मांडले आहेत. यात रस्ते दुरुस्तीच्या 1 हजार 815 कोटी रुपयांच्या खर्चाचे 38 प्रस्ताव आहेत. तर, गोरेगाव मुलुंड रस्त्याच्या विविध कामांचा 666 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. या दोन कामांवर 2 हजार 480 कोटीहून अधिक खर्च होईल तर इतर कामांचे प्रस्ताव मिळून स्थायी समितीच्या पटलावर 2 हजार 500 कोटी हून अधिक रक्कमेचे प्रस्ताव मांडण्यात आले आहे.

BMC
मुंबई : रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक

महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वेळेला रस्ते,उद्यानांच्या दुरुस्तीचे हजारो कोटी रुपयांचे प्रस्ताव मांडण्यात येतात.प्रशासनाने मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर 2 हजार 100 कोटी हून अधिक रक्कमेचे रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव मांडले होते. मात्र, त्यातील काही प्रस्ताव मागे घेण्यात आले. त्यामुळे आता 1 हजार 815 कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव आहेत. मुंबईतील विविध भागात सिमेंट काँक्रिटसह डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हा खर्च करण्यात येणार आहे.तसेच,येत्या काही आठवड्यात अजून रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

-पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा 15 ते 27 टक्के कमी दराने रस्ते दुरुस्ती होणार आहे.

-पुढील दोन वर्ष हे काम चालणार आहे.

-काँक्रिटच्या रस्त्याचा 10 वर्षांचा आणि डांबरी रस्त्यासाठी 3 वर्षांचा हमी कालावधी आहे.

दहा टक्के खर्च बोरीवलीत

1 हजार 815 कोटी रुपयांच्या खर्चापैकी 10 टक्क्याहून अधिक खर्च बोरीवली परीसरातील रस्ते दुरुस्तीवर होणार आहे.

-बोरीवली -185 कोटी 26 लाख

-भांडूप,विक्रोळी,पवई - 147 कोटी 35 लाख

-कुर्ला- 157 कोटी

-कांदिवली -- 122 कोटी 51 लाख

BMC
अनिल परब यांचे मेस्मा कारवाईबाबत मोठे विधान म्हणाले...

मेट्रो मार्गाखालून जाणार पूल

मुलूंड गोरेगाव जोड रस्त्यावर सहा पदरी पुल बांधण्यात येणार आहे.गोरेगाव रत्नागिरी हाॅटेल येथे सहा पदरी उड्डाण पुल,मूलूंड खिंडीपाडा येथे उच्चस्तरीय चक्रिय उन्नत मार्ग आणि मुलूंड येथील डॉ.हेडगेवकार चौक येथे सहा पदरी उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.यासाठी 666 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. रत्नागिरी हॉटेल चौक ते फिल्मसिटी सहा पदरी उड्डाणपूल 1.2 किलोमिटर लांबीचा कॉक्रिटचा पुल असेल.

रस्ता ओलांडण्याकरीता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिना असणार आहे. मुलुंड खिंड पाडा उन्नत मार्ग कामांमध्ये स्वयंचलित सरकत्या जिन्यासह चक्रीय मार्ग व तानसा जलवाहिनी यांच्यामधील रस्त्याचे बांधकाम व सुधारणा केली जाणार आहे.डॉ. हेडगेवार चौक सहापदरी उड्डाणपुल 1.8 किलोमिटर लांबीचा असून पुलाची कमान 60 मिटर उंचीची असेल. मुंबई मेट्रो-4 च्या खालच्या पातळीवर हा उड्डाणपूल प्रस्तावित आहे.

गोरेगाव मुलुंड हा मुंबईतील चौथा आणि शेवटचा पुर्व पश्‍चिम उपनगरांना जोडणारा जोड रस्ता आहे. या मार्गाची लांबी 12.2 किलोमिटर असून तब्बल 6 हजार 296 कोटी रुपयांचा खर्च आहे. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून 4.7 किलोमिटर लांबीचा बोगदा आणि गोरेगाव फिल्मसिटी परीसरात 1.6 किलोमिटर लांबीचा पेटी बोगदा असेल. भारतातील शहरांमधील हे सर्वात लांबीचे बोगदे असतील. चार टप्प्यात हे काम होणार असून पहिल्या टप्प्यात नाहूर येथील उड्डाण पुलाचा विस्तार करणे, दुसऱ्या टप्प्यात विद्यमान रस्त्यांची रुंदी वाढविण्यात येत असून मार्च 2022 पर्यंत हे काम पुर्ण होईल. तिसऱ्या टप्प्यात प्रमुख चौकांची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच,बोगद्यांचे काम करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. द्वितीय स्तरावरील उड्डाण पुलांचे काम करण्यात येणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com