मुंबई

मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून  विश्रांतीवर असलेल्या वरुणराजाने मंगळवारी मध्यरात्रीपासून मुंबईत चांगलाच जोर धरला. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर चांगलाच दिसून आला. पुढील दोन दिवस पालघरमध्ये मुसळधार तर ठाणे व मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. शुक्रवारी मुंबईत काही ठिकाणी बारा ते वीस सेंटीमीटरपर्यंत पाऊस होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली. 

दक्षिण कोकणात रविवारपर्यंत पाऊस जोमाने बसरणार आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्येही शुक्रवारी काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती)दिसून येत आहे. हा पट्टा क्षीण अवस्थेत असला तरीही अरबी समुद्र ते उत्तर कोकणापर्यंत वा-यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही स्थितीत पावसाचे प्रमाण चांगले राहते. या दोन्ही स्थितीमुळे ब-याच प्रमाणात ढगनिर्मिती होते आणि वारेही सशक्त होतात, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के एस होसाळीकर देतात. 

मंगळवारी मध्यरात्री पडलेल्या पावसाने सर्वात जास्त पावसाची नोंद मालाडमध्ये झाली. मालाडमध्ये 252.8 मिमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरांत वांद्रे येथे 198 मिमी, बोरिवलीत 113 मिमी, चिंचोळी अग्निशमन केंद्रात 124.7 मिमी, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय केंद्रात 103.1 मिमी, अंधेरीत 119 मिमी पावसाची नोंद झाली तर मध्य आणि पूर्व उपनगरीय परिसरात घाटकोपरमध्ये 121.94 मिमी, चेंबूरमध्ये 127.72 मिमी, कुर्ल्यात 102.33 मिमी पाऊस झाला. दक्षिण मुंबईत मलबारहिल परिसरात 115.3 मिमी पाऊस झाला. तर मुंबईबाहेर पालघरमध्ये 80 मिमी, डहाणूत वीस मिमी, रत्नागिरीत 50 मिमी पाऊस झाला. 

मंगळवारच्या पावसाच्या कामगिरीमुळे मुंबईत कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली. कमाल पाच अंशाने खाली घसरत 27.7 अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर किमान तापमानही दोन अंशाने खाली घसरत 27 अंशाने खाली घसरत 25.1 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. 

26 जुलै 2005 सारखा पाऊस होणार नाही
यंदाच्या सव्वीस जुलै रोजी मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. सव्वीस जुलै 2005 रोजी नऊशे मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा चौदा वर्षांपूर्वीप्रमाणे पाऊस होणार नाही, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली.

वातावरणात पावसासाठी पोषक वातावरण आहे. पावसाची माहिती अपडेट झाली की त्याची माहिती लोकापर्यंत पोहोचवली जाईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

सह्याद्रीचा माथा : नाशिकचा चक्रव्यूह कोण, कसा भेदणार? 

सोलापूरमध्ये रमेश कदमांची भूमिका ठरणार निर्णायक? २८ एप्रिलच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT