नालासोपाऱ्याक रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनचालकांना गुडघाभर पाण्यातून कसरत करावा लागली.
नालासोपाऱ्याक रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनचालकांना गुडघाभर पाण्यातून कसरत करावा लागली.  
मुंबई

नालासोपाऱ्यात पावसाचे थैमान

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : वसई-विरार, नालासोपाऱ्यात शनिवारी (ता.१४) रात्रीपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच नालासोपारा पूर्व-पश्‍चिम परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले.

सकाळच्या वेळेत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच दैना उडाली होती. त्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. पावसामुळे वारंवार याठिकाणी पाणी भरत असल्याने नागरिकांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला.

नालासोपारा पूर्व सेन्ट्रलपार्क, ओसवाल नगरी, तुळिंज आचोळे, संतोष भुवन, बिलालपाडा, धणीवबाग हे रस्ते पाण्याखाली गेले होते. नालासोपारा स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यातून मार्ग काढताना वयोवृद्ध नागरिक, महिला, पुरुष यांची मोठी गैरसोय झाली.

काही ज्येष्ठ नागरिक तर या साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडल्याच्या घटनादेखील घडल्या. नालासोपारा पश्‍चिम बसस्थानक, स्टेशन रोड, निलेमोरे गाव, सिविक सेंटर याठिकाणीही हीच अवस्था होती. 

पाण्यातून मार्ग काढताना रिक्षा, चार चाकी, दोन चाकी वाहन बंद पडल्याने त्यांना आपली वाहने ढकलत एक ते दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली. थोडा जरी पाऊस पडला, तरी नालासोपारा जलमय होत असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT