highest one day ris in Corona cases after march 17 in mumbai
highest one day ris in Corona cases after march 17 in mumbai   esakal
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्णात वाढ; १७ मार्चनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळो कोरोनाची चौथी लाटेची भिती निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 17 मार्चनंतर बुधवारी मुंबईत एकाच दिवसात सर्वाधिक 73 रुग्ण आढळले आहेत. मात्र, कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) रिपोर्टनुसार, कोरोनामुळे कोणताही नवीन मृत्यू झाला नसला तरी मुंबईतील मृतांची संख्या 19,560 इतकी झाली आहे. बीएमसीने म्हटले आहे की 73 पैकी 68 रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत तर पाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीपासून शहरात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी शहरात कोरोनाचे 23 रुग्ण आढळले. एक दिवस आधी मंगळवारी 52 प्रकरणे नोंदवली गेली. या वर्षी 3 मार्चपासून मुंबईत दररोज 100 पेक्षा कमी प्रकरणे समोर येत आहेत.

तर मुंबईतील पॉझिटिव्ह दर 0.005 टक्‍क्‍यांवरून 0.007 टक्‍क्‍यांवर पोहचल्याने दैनंदिन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या 9970 चाचण्या करण्यात आल्या. तर बुधवारी 51 रुग्ण बरे झाले. मुंबईतील कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचवेळी, तर देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 299 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे गेल्या 40 दिवसांतील सर्वाधिक संख्या आहे.

मुंबईत उपचारानंतर 51 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने, मुंबईतील बरे झालेल्यांची संख्या 10,38,676 वर पोहोचली असून 98 टक्के रिकव्हरी रेट आहे, शहरात 331 सक्रिय प्रकरणे आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा दर आता 16,538 दिवसांवर आहे, तर 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान केसेसचा एकूण वाढीचा दर 0.004 टक्के होता. विशेष म्हणजे, मुंबईत बुधवारपर्यंत एकूण 26,151 कोविड-१९ रुग्णालयातील खाटांपैकी केवळ 13 खाटांवर रुग्ण आहेत. मुंबई कोणत्याही सीलबंद इमारती आणि कंटेनमेंट झोनपासून सध्या मुक्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT