मुंबई

विधानसभा अध्यक्षांच्या रांगेत हितेंद्र ठाकूर 

सकाळ वृत्तसेवा


नालासोपारा : राज्यात सध्या टोकाचा सत्ता संघर्ष सुरू आहे. या सत्ता संघर्षात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार सध्या तटस्थ आहेत. त्यांनी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र, त्यांच्या आमदारकीच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करून, सचिवालयाकडून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव हंगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांकडे गेले असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

24 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळाले, पण निकाल लागताच मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने आपली चूल वेगळी मांडत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपला घरोबा करण्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रासाठी अस्थिर सरकारचे सूतोवाच निर्माण झाले.

 21 आणि 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री बंडखोर अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत राजकीय भूकंप घडविला. 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांना सत्ता टिकविण्यासाठी बहुमत स्पष्ट करायचे आहे. पण आमदारांना विधानभवनात शपथ देण्यासाठी आणि विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची गरज आहे.

सत्ता संघर्षात कोणत्या पार्टीचा विधानसभा अध्यक्ष होणार यापेक्षा ज्येष्ठतेनुसार महाराष्ट्रातील कोण हंगामी विधानसभा अध्यक्ष होऊ शकतो, यासाठी सचिवालयाकडून 17 ज्येष्ठ आमदारांची नावे राज्यपालांना पाठविण्यात आली आहेत. त्यात वसईचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे. 


17 विधानसभा सदस्यांची नावे 
सचिवालयातून राज्यपालांना सुपूर्द केलेल्या यादीत हरिभाऊ बागडे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, के. सी. पाडवी, कालिदास कोळंबकर, सुधीर मुनगंटीवार, विजय कुमार गावित, गिरीष महाजन, गोवर्धन शर्मा, हितेंद्र ठाकूर, प्रकाश भारसाखळे, मंगलप्रभात लोढा, बबनराव शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. 


1985 ते 1990 पासून ज्येष्ठतेनुसार नावे पाठवलेली असू शकतात, मी आता सातव्यांदा आमदार झालो आहे. त्यात माझे नाव असू शकते. पण जे जुने आमदार आहेत त्यांना ही संधी मिळाली पाहिजे. 
- हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT