Humint
Humint 
मुंबई

‘ह्युमिन्ट’ला पर्याय नाही!

सकाळवृत्तसेवा

मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला. त्याची खबरही गुप्तचर संस्थांना लागलेली नव्हती? तसे असेल, तर त्याचे पैकीच्या पैकी गुण त्या कारस्थानाच्या सूत्रधारांना द्यावे लागतील; पण तसे झालेले नव्हते...

या हल्ल्याचा एक सूत्रधार होता झरार शाह. वय वर्षे ३०. संगणकतज्ज्ञ. मनात भारताविषयी नितांत द्वेष. लष्कर-ए-तय्यबाच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख होता तो. या हल्ल्यासाठीची योजना तयार करण्याचे काम त्याच्याकडे होते. त्यासाठी त्याच्या मदतीला आले गुगल अर्थ, विकिमॅपिया आणि मॅप्स ऑफ इंडिया हे संकेतस्थळ. त्यांच्या साह्याने त्याने हल्लेखोरांना मुंबईचा मार्ग आखून दिला होता. हल्लेखोरांशी संपर्क ठेवण्यासाठी त्याने इंटरनेट फोन यंत्रणेची जोडणीही घेतली होती. त्यावरून कोणाला त्याचे स्थळ कळू नये यासाठी त्याने त्याचे सगळे कॉल न्यू जर्सीवरून ‘रिरूट’ केले होते. पण, तेव्हा त्याला याची जाणीव नव्हती की, त्याच्यावर ब्रिटनच्या गव्हर्नमेन्ट कम्युनिकेशन हेडक्वॉर्टर (जीसीएचक्‍यू) मधील गुप्तचरांची नजर होती. 
झरार शाहवर केवळ ब्रिटिश गुप्तचरांचेच लक्ष होते असे नव्हे. न्यू यॉर्क टाइम्सचे शोधपत्रकार जेम्स ग्लॅन्झ, सेबेस्टियन रोटेला आणि डेव्हिड ई.

सॅंगर यांच्या वृत्तानुसार, भारतीय गुप्तचरही त्याच्यावर नजर ठेवून होते. अमेरिकेला मात्र याचा पत्ता नव्हता; मात्र त्या दहशतवाद्यांचे काहीतरी कारस्थान शिजत आहे याची माहिती त्यांना इलेक्‍ट्रॉनिक आणि मानवी हेरगिरीतून मिळाली होती. या हल्ल्याच्या काही महिने आधी त्यांनी ती भारताला दिली होती; पण... या तिन्ही देशांच्या गुप्तचरांना त्या षड्‌यंत्राचे धागे जोडता आले नाहीत. ब्रिटिशांकडे शाहच्या इंटरनेटवरील हालचालींची, माहिती देवाणघेवाणची भरपूर माहिती होती. अमेरिकेच्या हाती तर डेव्हिड कोलमन हेडलीच्या पत्नीने दिलेली स्फोटक माहिती होती. तो पाकिस्तानी दहशतवादी आहे, मुंबईला कसल्याशा गूढ मिशनसाठी तो जाऊन आलेला आहे, असे तिने अमेरिकी दहशतवाद विरोधी यंत्रणेला सांगितले होते. पण, मुंबईवर दहशतवादी हल्ला होईपर्यंत कोणालाच त्याचे महत्त्व समजले नव्हते.

न्यू यॉर्क टाईम्स, प्रोपब्लिका आणि फ्रंटलाईन यांनी मिळून या हल्ल्यानंतर केलेल्या या संशोधनाचा एकच निष्कर्ष होता- इलेक्‍ट्रॉनिक हेरगिरी उत्तमच. पण, मानवी हेरगिरीला (ह्युमन इंटेलिजन्स, ह्युमिन्टला) तो पर्याय ठरू शकत नाही. या हल्ल्याने जगाला दिलेला हा संदेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT