वसई ः नेहमी गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या शुकशुकाट दिसत आहे.
वसई ः नेहमी गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या शुकशुकाट दिसत आहे. 
मुंबई

चक्रीवादळाचा पर्यटनाला तडाखा

सकाळ वृत्तसेवा

वसई ः निसर्गरम्य वसईला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे बाराही महिन्यात येथे पर्यटकांचा राबता असतो; मात्र सध्या महाचक्रीवादळाची भीती आणि किनाऱ्यावर बंदी घालण्यात आल्याने पर्यटकांनीही येथील किनाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे.

याचा फटका स्थानिक रिसॉर्टचालक आणि मालकांना बसला आहे. शनिवारी आणि रविवार आगाऊ नोंदणी झालेली नसून अधूनमधून येणाऱ्या नागरिकांचाही प्रतिसाद मिळत नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे रिसॉर्ट चालकांनी सांगितले. पाऊस आणि वादळाचा किनाऱ्याजवळील मच्छीमारांसह शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. त्यांनी लागवड केलेल्या भातशेतीचे आणि भाजीपाल्याचेही अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. तसेच मासेमारीदेखील बंद असल्याने सुक्‍या मासळीवर संक्रांत आली आहे.

उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर आला आहे. त्यातच स्थानिक नागरिकांनी व्यवसायाचे साधन म्हणून कळंब, राजोडी, अर्नाळा समुद्रकिनारी रिसॉर्ट उभारले आहेत. सूर्याचा अत्यंत मन मोहून टाकणारा नजारा, समुद्रात डुबकी मारण्यासह निसर्गसौंदर्य अनुभवण्यासह विस्तीर्ण समुद्रकिनारी हुंदडण्यासाठी मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातून वसईत नेहमीच गर्दी होत असते. राहण्याची व्यवस्था असल्याने आधीच नोंदणी केली जाते.

दोन दिवस मनमुराद आनंद लुटून पर्यटक परतीचा मार्ग धरतात. या वेळी येथील मातीत पिकणारा हिरवागार भाजीपाला, मासे आणि आठवणी ते सोबत घेऊन जातात; परंतु महाचक्रीवादळाचा दिलेला इशारा पाहता कुटुंब, मित्रमंडळींनी समुद्रकिनारी जाण्याचे टाळले आहे.

महाचक्रीवादळामुळे ८ नोव्हेंबरपर्यंत समुद्राच्या जवळील रिसॉर्ट बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. तसेच समुद्राजवळ पर्यटकांनी जाणे टाळावे, अशा सूचना दिल्या आहेत. 
स्वप्नील तांगडे, उपविभागीय अधिकारी, वसई 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT