ठाणे ः कारवाईत जप्त केलेल्या बनावट नोटा दाखवताना पोलिस उपायुक्त दीपक देवराज व पोलिस अधिकारी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे ः कारवाईत जप्त केलेल्या बनावट नोटा दाखवताना पोलिस उपायुक्त दीपक देवराज व पोलिस अधिकारी. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

ठाण्यातील बनावट नोटांचे इगतपुरी कनेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : वागळे इस्टेट परिसरात ठाणे पोलिसांनी सापळा रचून २ लाख ८३ हजाराच्या ५०० रुपये किमतीच्या नकली नोटांसह काळूराम बुद्धा इंदवाळे (कसारा, ता. शहापूर) याला अटक केली होती. ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचकडून सुरू असलेल्या तपासात या बनावट नोटांचे इगतपुरी कनेक्‍शन उघड झाले आहे.

पोलिसांनी नोटा बनवण्यासाठी लागणारी सामुग्री हस्तगत केली आहे. ठाणे न्यायालयाने आरोपी इंदवाळे याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील फरारी आरोपी कांतिलाल मोकाशी याचा पोलिस शोध घेत आहेत.

चलनातील पाचशे रुपयांच्या ५६६ बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या काळूराम इंदवाळे (४०) याला वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनिटने गेल्या सोमवारी तीन हात नाका येथील आरटीओ कार्यालयाजवळून अटक केली होती.

हे भामटे दीड लाखात तीन लाखांच्या बनावट नोटा देत असत. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी सखोल तपास करून फरारी आरोपी मोकाशी याच्या इगतपुरी येथील घरात छापा मारून नोटा बनवण्यासाठी लागणारी सामुग्री हस्तगत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT