IIT Drones to extinguish fire in Mumbai
IIT Drones to extinguish fire in Mumbai sakal
मुंबई

ड्रोन विझवणार मुंबईतील आग!

किरण कारंडे

मुंबई : मुंबईत उंच इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याच्या तयारीत आहे. या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई अग्निशमन दलाकडून प्राथमिक तयारीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई तसेच स्टार्टअप कंपन्यांचीही मदत अग्निशमन दलाने घेतली आहे. मुंबईतील इमारतींसाठीची सध्याच्या उंचीची मर्यादा २०० ते २५० मीटर आहे; पण तिसाव्या माळ्यापर्यंत शिडीच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य नाही. अग्निशमन दलाकडे असणाऱ्या शिडीची कमाल उंची ९० मीटर आहे.

मुंबईतील वाहिन्यांचे भूमिगत जाळे आणि भूमिगत मेट्रोचे प्रकल्प पाहता अधिक वजनाच्या आणि उंचीच्या शिडी लावण्यासाठी मर्यादा आहे. अधिक वजनामुळे उंच शिडीचे इंजिन खचण्याची शक्यता असते. त्यामुळे अंतर्गत उपाययोजनांवरच मुंबईतील इमारतींना अवलंबून राहावे लागत आहे. मात्र आता एक पर्याय म्हणून ड्रोन तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असा विश्वास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ड्रोनसंदर्भात अग्निशमनच्या अपेक्षा

  • ड्रोनद्वारे ३०० मीटर उंचीवर जाऊन आग विझवावी

  • किमान दोन तासांचा बॅटरी बॅकअप असावा

  • ड्रोनच्या मदतीने पाईप उंच ठिकाणी पोहोचावा

  • रेस्क्यू ऑपरेशनसाठी ड्रोन उपयुक्त असावा

भविष्यात अधिक उंचीवरील आग विझवण्यासाठी ड्रोनची गरज भासणार आहे. पुढील सहा ते आठ महिन्यांत हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच आयआयटी मुंबईदेखील या तंत्रज्ञानावर काम करत आहे.

- हेमंत परब, मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT