ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

मधोमध एक चौकोन, त्यात एक त्रिकोण आणि त्रिकोणात एक वर्तुळ काढून त्याच्या केंद्रात बाबा बंगाली बसले होते.
lok sabha election narendra modi politics
lok sabha election narendra modi politicsSAkal

स्थळ : कमरा नंबर १०२, रेड रोज होटल, कॅफे डिलाइट के सामने. वेळ : अनिष्ट.

मध्यरात्री बाराचे टोले पडले. दरवाजा करकरला. सारे जग झोपी गेलेले असताना सुप्रसिध्द मांत्रिक बाबा बंगाली यांच्या कमऱ्यात मात्र जाग होती. मधोमध एक चौकोन, त्यात एक त्रिकोण आणि त्रिकोणात एक वर्तुळ काढून त्याच्या केंद्रात बाबा बंगाली बसले होते. काही मेणबत्त्या, अगरबत्त्या पेटलेल्या, आणि समोर विझलेले आम्ही!!

गेले काही दिवस आम्ही विचित्र वागतो आहो, असे वाटून कुटुंबीयांनी बरेच वैद्य- डागतर केले. शेवटी वेळ गंडादोऱ्यांवर आली. कुठल्या तरी भटकत्या आत्म्याने आम्हाला घोळसले आहे, असा वहीम होता. हे भटकते आत्मे हा फार्फार चिंतेचा विषय आहे.

मोक्ष न मिळाल्याने हे आत्मे विनाकारण हिंडत बसतात, आणि जरा कुठे मऊ लागले की धरुन घोळसतात. असा भटकता आत्मा मानगुटीवर बसला की शहाणी व्यक्तीही जाबडल्यागत बोलते. वास्तविक आमचा काही असल्या गोष्टींवर विश्वास नाही.

पण कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. योगायोग असा की इलेक्शन जाहीर झाल्याच्या दिवशीच आम्हाला भटकत्या आत्म्याने झपाटले. भुते घालवण्याचे काम सुप्रसिध्द मांत्रिक बाबा बंगाली यांना चांगले जमते.

‘करणी, भानामती, हमारे यहां जादूटोना, काली जादू, भूतप्रेतपिशाच्च बाधा इत्यादी के उपर जालीम इलाज वाजीब दामपर ग्यारंटी के साथ किया जायेगा.’ असे त्यांनी दारावरल्या पाटीवरच जाहीर केले आहे.

…मध्यरात्री त्या कमऱ्यात एक किंकाळी घुमली. ती आमचीच होती. कारण बाबा बंगाली यांनी आमच्या पाठीत झाडूच्या मागील बाजूने कुणका घातला होता!!

‘‘अलल…डुर्रर्र…अबर्र…गबर्र…जिन्न की भर्रर्र...,’’ बाबा बंगाली काहीतरी पुटपुटले. आम्हाला वेगळाच वास आला. ‘ग्यास झाला असेल तर सोडा घ्या,’

असे आम्ही त्यांना चांगल्या हेतूने सांगितले, पण त्यांचा भलताच गैरसमज झाला. त्यांनी पुन्हा पाठीत कुबका घातला. पुन्हा आम्ही किंचाळलो.

‘‘यह बहुत जालीम आत्मा है…ऐसी ठिकाने नहीं आयेगी!’’ बाबा बंगाली यांनी डायग्नोसिस जाहीर केले. उलट्या पिसांच्या तीन मुर्ग्या, छत्तीस अंडी, किलोभर

कांदे-टमाटे, दोन किलो खिमा, तीन पाकिटे मसालेवाली चणाडाळ, टुकडाचकली, पापड आणि फुल खंबा (खुलासा : मद्याची बाटली…भरलेली!

प्लीज नोट!) एवढा खर्च येईल, असे त्यांनी सांगून टाकले. आत्म्याला मुक्ती देण्याच्या प्रक्रियेत फुल खंबा रिकामा करुन त्याच बाटलीत ते पिशाच्च भरावे

लागेल, असे त्यांनी मोकळेपणाने स्पष्ट केले. एवढी पारदर्शकता हल्ली कोण दाखवते? बंगालीबाबांचा विजय असो.

हल्लीच्या दिवसात कोणीही जपून फिरावे. हे भटकते आत्मे कधी घेरतील, काही भरोसा नाही. काही भटकते आत्मे महाराष्ट्रातच फिरतात. काही दिल्लीहून

येतात. काही आत्मे गुजराथ साइडहून आल्याचेही बाबा बंगाली यांनी सांगितले. या भटकत्या आत्म्यांचे काम एकच- चांगल्या भल्या माणसाला घोळसणे.

त्यांच्या चांगल्या कामात अडथळे आणणे. ‘‘कौन हो तुम? बताव? बऱ्या बोलानं झाड कू छोडो! नाहीतर ब्रुम…फट…ख्रुम…खर्रर्र खक..खक..!’’ यावेळी डोक्यात दणका बसला. पुढले काही आठवत नाही. जाग आली तेव्हा बाबा बंगाली आडवे झोपले होते. (फुल खंब्याचे रिकाम्या बाटलीत रुपांतर झाले होते.)

‘‘मला काय झालं होतं?,’’ ‘मैं कहां हूं?च्या चालीवर कुटुंबीयांना आम्ही निरागस प्रश्न विचारला.

‘‘मीडिया नावाच्या भयंकर भटकत्या आत्म्यानं तुला घोळसला! निवडणूक होईपर्यंत बातम्या वगैरे काही बघू नकोस! हे मीडियाचं भूत समोर आलं की भलेभले झपाटले जातात!!,’’ कुणीतरी सांगितले. एक संकट टळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com