मुंबई

IIT Mumbai :आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात एसआयटीघ्या तपासात नवीन माहिती समोर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाने दर्शन सोळंकी सोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अरमान खत्रीला रविवारी अटक केली. या प्रकरणात तपास करत असलेल्या एसआयटी टीमने अटक करण्यापूर्वी अरमानची चौकशी केली होती.

या तपासात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. आक्षेपार्ह टिप्पणी केली म्हणून अरमानने रागात दर्शनला कटर दाखवत धमाकवल्याची माहिती एसआयटीच्या तपासात समोर येत आहे. परंतु अरमान सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र या घटनेबद्दल नकार दिला आहे. दुसरीकडे दर्शनच्या आत्महत्येस फक्त अरमान जबाबदार नसल्याचे मत दर्शनच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.

कटर दाखवल्याचा आरोप

दर्शन सोळंकीच्या खोलीत सापडलेली चिठ्ठी त्यानेच लिहिल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या हस्ताक्षर विश्लेषण कक्षाने दिलेल्या अहवालात शुक्रवारी स्पष्ट झाले. विशेष तपास पथकाने अरमानची चौकशी केली होती.

दर्शन सोळंकी व अरमान वसतिगृहात एकाच मजल्यावर राहत होते. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. दर्शन सोळंकीने आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या रागातून अरमानने त्याला कटर दाखवून धमकाविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे दर्शन घाबरला होता. त्याने खत्रीची माफीही मागितली होती, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.दरम्यान, अरमानने धमकावण्यासाठी वापरलेल्या कटरचा शोध घेणार असून काही व्यक्तींचे जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.चाकूबाबतचा दावा पूर्णत: खरा नसल्याचे मित्रांनी तपासात सांगितले आहे .

दर्शन अरमान मैत्री

एसआयटी पथकाने अरमान सोबत शिकणाऱ्या काही सोबत्‍यांची देखील चौकशी केली. त्यांच्या मते, अरमान आणि दर्शन हे चांगले मित्र बनले होते. ते दोघेही जवळचे होते आणि की दर्शन त्याच्या परीक्षेतील कमी गुणांमुळे डिप्रेशनमधून जात असल्याची अरमानला माहित असल्याचे तपासात माहिती मिळत आहे.

एकमेव कारण नाही

9, 10 आणि 11 फेब्रुवारीला तीन दिवस दर्शनने अरमानसोबत वाद केल्याचा एसआयटी पथकाचा दावा आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला दर्शनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे एकमेव कारण असू शकत नाही असे मत दर्शनच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.

आम्हाला या भांडणाच्या कारणाविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही, परंतु एसआयटीने सांगितले की अरमानने वसतिगृहाच्या खोलीत कटरने दर्शनाला धमकावले. दर्शनाचया निधनामागे एकुलता एक हेच कारण असू शकत नाही, असे माझे मत असल्याचे रमेश सोळंकी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT