Construction
Construction 
मुंबई

मुंबईत वाढताहेत बेकायदेशीर बांधकामं

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत अनधिकृत बांधकामे फोफावली असून, महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडे ९४ हजार ८९१ तक्रारी आल्या; त्यापैकी पाच हजार तक्रारींची दखल घेण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी अवैध बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे केली आहे. बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी महापालिका दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, अनधिकृत बांधकामे ‘जैसे थे’ आहेत. एक मार्च २०१६ ते आठ जुलै २०१९ दरम्यान ९४ हजार ८५१ ऑनलाइन तक्रारींची नोंद झाली. त्यापैकी केवळ ३२३ बांधकामे पाडल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

दर वर्षी १५ हजारांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांना महापालिका नोटिसा बजावते. त्यापैकी फक्त १० ते २० टक्के बांधकामांवर कारवाई होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT