जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर थंडीमुळे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर थंडीमुळे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे.  
मुंबई

रायगडमधील पर्यटनाला हुडहुडी!

सकाळ वृत्तसेवा

रोहा : रायगड जिल्ह्यात थंडीने पुन्हा जोर धरला आहे. सध्या वारेही वाहत असल्याने थंडी बोचरी झाली आहे. या वर्षी पावसाचा मुक्काम नोव्हेंबर महिन्यापर्यंत असल्याने हिवाळाही उशिराने सुरू झाला. त्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर थंडीमुळे पर्यटकांनी पाठ फिरविली असून समुद्रकिनाऱ्यांसहित कुंडलिका खोरेही ओस पडले आहे.

कुंडलिका नदीत दर शनिवार-रविवारी 250 ते 300 पर्यटक रिव्हर राफ्टिंगसाठी येतात. त्यांची संख्या घटली असून या आठवड्यात फक्त 30 ते 40 पर्यटकांनी राफ्टिंगसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक चिंतेत आहेत.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. रोहा, अलिबाग, माणगाव, खोपोलीतील तापमान गुरुवारी 12 ते 15 अंश सेल्सिअस इतके होते. त्यामुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनसारखे पर्यटकांनी कायम गजबजलेले समुद्रकिनारे निर्मनुष्य झाले आहेत.

सुतारवाडी परिसरात रिसॉर्ट व फार्म हाऊसवर दर आठवड्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 1 ते दीड हजारपर्यंत असते. मात्र या आठवड्यात ही संख्या कमालीची घटली असून ती 100 ते 200 इतकी खाली आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

वाढलेल्या थंडीमुळे पर्यटकांनी बाहेर पडणे टाळले असावे. पर्यटकांची संख्या अगदीच रोडावली असल्याचे कोलाड येथील साईश्रद्धा उपाहारगृहचे दिनेश चिंचवडे यांनी सांगितले. माणगाव येथील देवकुंड परिसरात प्रशासनाने 26 डिसेंबरपासून लागू केलेली प्रवेशबंदी अजूनही उठवली नसल्याने तेथील पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कर्जतला पसंती 
मुंबई, पुणे शहराला पर्यायाने जवळ असलेल्या कर्जत भागातील तापमानसुद्धा घसरले असले तरी येथील रिसॉर्टना शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हिवाळी कॅम्पसाठी पसंती दिली आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. शाळा व कॉलेजच्या हिवाळी कॅम्पसाठी विद्यार्थी आले असल्याने तालुक्‍यातील पर्यटन व्यवसाय चांगला सुरू आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कॅम्पमुळे व्यवसायाला आधार मिळत असल्याचे कर्जतमधील रॉयल कर्जत कॅम्पचे संतोष दगडे यांनी सांगितले. 

गेल्या रविवारपासून पर्यटकानी सुतारवाडी भागाकडे पूर्ण पाठ फिरवली असून व्यवसाय ठप्प झाला आहे. दर आठवड्याला हजारहून अधिक पर्यटक यायचे. मात्र या आठवड्यात जेमतेम 100 ते 200 पर्यटकच आले आहेत. 
- दिनेश कोदे, हंस रिसॉर्ट, सुतारवाडी 

राफ्टिंगसाठी कुंडलिका नदीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या या आठवड्यात कमालीची घटली. दर शनिवार व रविवारी 250 ते 300 पर्यटक असत; मात्र या आठवड्यात जेमतेम 30 ते 40 पर्यटकांनी नोंद केली आहे. 
- सुयश घावटे, रॉकहिल रिव्हर राफ्टिंग 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT