मुंबई मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेने घेतला 'हा' निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

रविवारी पहाटे जादा लोकल सोडणार

मुंबई : "टाटा मुंबई मॅरेथॉन 2020' शर्यतीसाठी पश्‍चिम रेल्वे रविवारी (ता. 19) रात्री विरार आणि चर्चगेटदरम्यान दोन जादा लोकल चालवणार आहे. या शर्यतीसाठी देश-विदेशांतून येणारे धावपटू आणि क्रीडाप्रेमींच्या सोईसाठी या अतिरिक्त लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.

महत्वाची बातमी मुख्यमंत्री कार्यालयात होणार कर्मचारी कपात, कारण तर जाणून घ्या..

पहिली विशेष लोकल विरार स्थानकावरून शनिवारी मध्यरात्रीनंतर 2.20 वाजता सुटेल आणि चर्चगेटला रविवारी पहाटे 4.20 मिनिटांनी पोहोचेल. दुसरी विशेष लोकल बोरिवली येथून शनिवारी पहाटे 3.15 वाजता सुटेल आणि 4.22 वाजता चर्चगेटला पोहोचेल.

मोठी बातमी "संजय राऊतांची फक्त १० मिनिटं सुरक्षा काढा, मग बघा काय होतं.."

या लोकल नालासोपारा, वसई रोड, नायगाव, भाईंदर, मिरा रोड, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, राम मंदिर, जोगेश्‍वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड, वांद्रे, माहीम, माटुंगा रोड, दादर, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड, चर्नी रोड, मरिन लाईन्स या स्थानकांवर थांबतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Western railway take this decision for Mumbai marathon