जुईनगरमधील अण्णा भाऊ साठे भवनाचे उद्‌घाटन
जुईनगरमधील अण्णा भाऊ साठे भवनाचे उद्‌घाटन 
मुंबई

अण्णा भाऊ साठे भवनाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात विविध जाती-धर्म, पंथ, बहुभाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. येथील प्रत्येक नागरिकाचा सन्मान करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रत्येक घटकांची असून, ती प्रत्येकाने पूर्ण केली आहे. शहरात अनेक समाजासाठी योगदान देणारे महापुरुष, विचारवंतांच्या वास्तू उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही केवळ विकासाच्या दृष्टीने वाढणारी नगरी नसून, नवी मुंबई महामानवांच्या विचारांचा सन्मान करणारी नगरी असल्याचे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी केले.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जुईनगर सेक्‍टर १० येथील भूखंड क्र. १२७ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती भवन उभारण्यात आले आहे. या भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. १४) पार पडला. त्या वेळी आमदार नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मातंग समाजाचे नेते स्व. बाबासाहेब गोपले यांचे नाव सभागृहाला देण्यात आले आहे. या सभागृहाचेदेखील उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी आमदार गणेश नाईक म्हणाले, की मातंग समाजाचे नेते स्व. बाबासाहेब गोपले आणि स्व. उमाकांत नामवाड यांनी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे. आजचा हा दिवस जरी सोन्याचा असला, तरी गोपले व नामवाड यांची असणारी उणीव नाईक यांनी व्यक्त करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे हा समाज चालत असून, समाजाच्या उन्नतीसाठी आपण सदैव पाठिशी राहू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमाला महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते रवींद्र इथापे, ज्येष्ठ नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सूरज पाटील, स्थानिक नगरसेविका रुचा पाटील आदी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे तर माझे भाग्य ः महापौर
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मृती भवनाच्या कामाचे उद्‌घाटन आणि त्याचे लोकार्पण अशा दोन्ही कार्यक्रमांची मला मिळालेली संधी हे माझे भाग्य समजतो, असे महापौर जयवंत सुतार म्हणाले. आमदार गणेश नाईक यांनी प्रत्येक समाजाला राजकारणात दिलेली संधी आणि प्रत्येक समाजाला दिलेले मानाचे स्थान हे त्यांच्याशिवाय कुणीही देऊ शकणार नसल्याचे महापौर सुतार म्हणाले. यापुढेही शहराचा विकास करताना प्रत्येक समाजाला स्थान दिले जाईल, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT