st bus
st bus sakal
मुंबई

राज्यभरात एसटीवर दगडफेकीच्या घटना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळाने संपरकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि रोजंदारी गटातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचा धडाका सुरू केला. त्यामुळे एसटी कर्मचारी आता कर्तव्यावर हळूहळू रुजू होत आहे. मात्र, त्याचा संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये संताप उमटत असून, ठिकठिकाणी बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहे. त्यांनतरही रविवारी एकूण 1108 बसेल रस्त्यावर धावल्या असून, 18 हजार 375 एसटी कर्मचारी कामावर आल्याचा दावा महामंडळाने केला असला तरी त्यामध्ये चालक, वाचकांची संख्या नगण्य दिसून येत आहे.

रविवारी सुद्धा एसटी महामंडळाने निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई सुरूच ठेवली आहे. यामध्ये 93 कर्मचारी निलंबित तर 29 रोजंदार गटातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे. त्यामुळे निलंबनाची संख्या आता 6497 तर सेवा समाप्तीची संख्या 1525 वर पोहचली आहे. रविवारी औरंगाबाद, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, वर्धा, कोहपूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक या विभागात एसटीच्या सेवा सुरू झाल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

रविवार पर्यंत हजर झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या

विभाग - एकूण - हजर कर्मचारी - संपातील कर्मचारी

प्रशासकीय - 9426 - 8060 - 1366

कार्यशाळा - 17560 - 5679 - 11881

चालक - 37225 - 2467 - 34758

वाहक - 28055 - 2169 - 25886

एकूण - 92266 - 18375 - 73891

सुरू झालेल्या आगारांची संख्या

प्रदेश - एकूण आगार - सुरू आगार

औरंगाबाद - 43 - 3

मुंबई - 45 - 20

नागपूर - 26 - 2

पुणे - 55 -22

नाशिक - 44 - 3

अमरावती - 33 - 0

एकूण - 250 - 50

संपकाळात आतापर्यंत 31 तोडफोडीच्या घटना

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान राज्यभरात सुमारे 31 तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. यामध्ये सर्वात आधी मंगळवेढा येथे अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून एसटीच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर तुळजापूर, पांढरकवडा, अंबेजोगाई, इस्लामपूर, पुसद, सांगली, मिरज, पैठण, जळगाव, विटा आटपाडी, नाशिक बीड , भुसावळ, दापोली, सांगली, सोलापूर, शिराळा आणि आर्वी या डेपोमध्ये दगडफेक करून काचा फोडण्याचा घटना पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT