मुंबई

नवी मुंबईत घरभाडे वाढले! 

सकाळवृत्तसेवा

वाशी - नवी मुंबईत सिडकोने ठरवून दिलेल्या दरांना बगल देत बांधकाम व्यावसायिक जादा दराने घरे विकत असल्याने ती खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्‍यात राहिलेले नाही. त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहत आहेत; परंतु घरांच्या तुलनेत भाडेकरूंची संख्या वाढल्याने इस्टेट दलालांनी जादा कमिशन मिळत असल्यामुळे घरभाड्याचे दर मनमानी करून यंदा 25 ते 30 टक्के वाढवले आहेत. त्यामुळे शहरात घर भाड्याने घेणेही आता सामान्यांच्या आवाक्‍यात राहिलेले नाही. यामुळे भडेकरूही हवालदिल झाले आहेत. 

सिडकोने घरे व दुकानांचे दर निश्‍चित केले असले तरी बांधकाम व्यावसायिक मनमानी करून जादा दराने घरे विकत असल्याने घर घेणे सामान्यांसाठी स्वप्नच ठरत आहे. यामुळे त्यांनी भाड्याच्या घराचा पर्याय निवडला आहे; परंतु काही महिन्यांपासून घरमालकांनी 25 ते 30 टक्के भाडेवाढ केल्यामुळे परवडेल असे घर शोधण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे. वाशी, पाम बीच, नेरूळ, ऐरोली व सीवूडस या परिसरात सर्वाधिक दराने घरे भाड्याने दिली जातात. त्यामुळे कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, तुर्भे या परिसरात तुलनेने सामान्यांना परवडेल अशी भाड्याची घरे आहेत. मात्र तरीही करार संपल्यानंतर 10 टक्के भाडेवाढीऐवजी नवीन भाडेकरू आणून दरमहा तीन ते पाच हजारांनी वाढ केली जाते. यामुळे सर्वसामान्यांना भाड्याचे घर शोधताना पायपीट करावी लागत आहे. 

विशेष म्हणजे या व्यवहारात घर व दुकाने भाड्याने मिळवून देणाऱ्या दलालांची चलती आहे. वेळ नसल्याने घरमालक सर्व व्यवहार दलालांवर सोपवून भाडे आकारण्याचेही अधिकार त्याला देतात. त्यामुळे कमिशनच्या हव्यासापोटी ते भाडे वाढवतात. जादा भाडे मिळते म्हणून मालकही खूश होतात. मात्र त्याची झळ भाडेकरूंना बसते. प्रामुख्याने नोकरदार आणि कामगार भाडेकरू आहेत. तुलनेत पगार वाढत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. 

वन बीएचके भाडे (हजारात) 
वाशी 17 ते 21 
पाम बीच 17 ते 18 
सीवूडस 14 ते 15 
कोपरखैरणे 9 ते 10 
ऐरोली 12 ते 14 

वाढती महागाई, कर्जाचे हप्ते, उदरनिर्वाहाचे साधन, कायद्यातील किचकट प्रक्रिया यामुळे घरमालकांकडून अधिक भाड्यासाठी तगादा लावला जातो. त्यामुळे घरभाडे वाढवण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून घर रिकामे करून भाडे वाढवून नवीन भाडेकरू ठेवला जातो. 
- विनायक पेडणेकर, इस्टेट एजंट. 

अकरा महिन्यांचा करार संपल्यानंतर शक्‍यतो घरमालक पुन्हा करार करण्यास राजी नसतात. करार वाढवला तर नियमाने 10 टक्के भाडेवाढ होते; परंतु नवीन भाडेकरू 25 ते 30 टक्के म्हणजे सरळ अडीच ते तीन हजार जादा भाडे देतो. त्यामुळे जुन्या भाडेकरूंना करार वाढवून मिळणे अवघड झाले आहे. 
- सागर कांबळे, रहिवासी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT