मुंबई

एचआयव्हीग्रस्त रुग्णांमध्ये होतेय वाढ

सकाळ वृत्तसेवा


कल्याण : १ डिसेंबर जागतिक एड्‌स दिन सर्वत्र साजरा करत असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणात एचआयव्हीग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे आढळून आले आहे. ही चिंतेची बाब असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून उपाययोजना करण्याचे आवाहन पालिकेने 
केले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत साथ रोग रुग्णाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे एचआयव्हीग्रस्त रुग्णांची शोधमोहीम राबवली जाते. एप्रिल ते मार्च २०१८ या कालावधीत सर्वसामान्य नागरिक चार हजार ९५६; तर गरोदर महिला तीन हजार ४४६ अशा एकूण आठ हजार ४२२ जणांची एचआयव्ही चाचणी पालिकेने केली. यामध्ये सर्वसामान्य नागरिक १३३; तर गरोदर महिला दोन अशा एकूण १३५ जणांना एचआयव्हीची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत; तर एप्रिल ते ऑक्‍टोबर २०१९ या कालावधीत राबवलेल्या शोधमोहिमेत सर्वसामान्य नागरिक तीन हजार ४४१; तर गरोदर महिला दोन हजार ६८७ अशा एकूण सहा हजार १२८ नागरिकांची एचआयव्ही तपासणी केली. यामध्ये सर्वसामान्य नागरिक ७१; तर गरोदर महिला चार अशा एकूण ७५ जणांना एचआयव्हीची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार 
सुरू आहेत.


विविध कार्यक्रमांचे आयोजन
जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एड्‌स दिन साजरा केला जातो. या वर्षी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने १ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ डिसेंबर रोजी पालिकेच्या रुक्‍मिनीबाई रुग्णालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २ डिसेंबर रोजी एड्‌स जनजागृतीसाठी कल्याणमधील रुक्‍मिणीबाई रुग्णालय ते सुभाष मैदान अशी फेरी काढण्यात येणार असून यात कॉलेज विद्यार्थ्यांमार्फत प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT