Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत; 18 वर्षांच्या तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत केल्याप्रकरणी 18 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाला अँन्टॉपहिल पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत केल्याप्रकरणी 18 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाला अँन्टॉपहिल पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

व्हिडिओ कॉलद्वारे आरोपीने पीडित मुलीचे आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीनुसार आरोपी मुलावर विनयभंग, पोक्सो कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

15 वर्षांच्या पिडीत मुलीची आणि आरोपी दोघांमध्ये आधीपासून ओळख होती. पीडित मुलीला 30 जानेवारी रोजी आरोपीने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी आरोपीने तिचे आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण केले होते.

त्यानंतर पीडित मुलीच्या परिचीत व्यक्तींकडून तिचे अश्लील चित्रीकरण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रसारीत झाल्याची माहिती मिळाली. मुलीने चित्रीकरण पाहिले असता तिला धक्का बसला. जानेवारी महिन्यात आरोपी तरूणाला व्हिडिओ कॉल केल्याचे तिच्या लक्षात आले.त्यानंतर तिने याप्रकरणी शनिवारी अ‍ॅन्टॉपहिल पोलिसांकडे तक्रार केली.

त्यानुसार पोलिसांनी विनयभंग, पोक्सो व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यानंतर शनिवारी त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT