इन्स्टाग्राम किंग डॅन ब्लिजेरियन गोव्यात
इन्स्टाग्राम किंग डॅन ब्लिजेरियन गोव्यात  
मुंबई

इन्स्टाग्राम किंग डॅन ब्लिजेरियन गोव्यात 

सकाळ वृत्तसेवा

पणजी : सोशल मीडियावरील कोट्यवधी चाहत्यांचा लाडका, इन्स्टाग्राम किंग व अमेरिकन पोकर स्टार डॅन ब्लिजेरियनने नुकतीच इंडियन पोकर चॅम्पियनशिपच्या गोव्यात झालेल्या सांगता समारंभात हजेरी लावली. पार्टन पोकरतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी गोव्यातील बिग डॅडी या आलिशान क्रूझवर सुमारे दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. 

स्पार्टन पोकरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी सहा कोटींहून अधिक बक्षिसांची रक्कम ठेवण्यात आली होती. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत मुंबई, पुण्यासह देशातील अनेक शहरांतील खेळाडू सहभागी झाले होते. या सर्व खेळाडूंचे पोकरमधील डावपेच जवळून पाहण्याचा अनुभव या वेळी उपस्थितांनी घेतला. 

स्पार्टन पोकरचे विशेष कार्यकारी अधिकारी अमिन रोझानी यांनी यापत्रकारांशी बोलताना पोकरच्या भारतातील स्थितीविषयी माहिती दिली. पोकर हा खेळ भारतात म्हणावा तितका रुजलेला नाही. भारतीय खेळाडू अजूनही यापासून लांब आहेत. या खेळासाठी विशिष्ट अभ्यासाची गरज असते, परंतु देशातील नागरिकांच्या मनातील या खेळाबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. हे आव्हान कठीण असले तरी ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
जगभरात पोकर खेळण्यासाठी व विशिष्ट जीवनशैलीसाठी डॅन ब्लिजेरियन ओळखला जातो. त्याचे कपडे, तो वापरत असलेले घड्याळ याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. या वेळी त्याची एक झलक दिसावी म्हणून हजारो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी चित्रपट अभिनेते रणविजय सिंग, कुणाल खेमू, मिनीषा लांबा हेही उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT