Irfan Bhure as the director of the Bhiwandi Agricultural Produce Market Committee
Irfan Bhure as the director of the Bhiwandi Agricultural Produce Market Committee 
मुंबई

राष्ट्रवादीचे इरफान भूरे यांची भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समितीवर संचालक पदी निवड

सकाळवृत्तसेवा

वज्रेश्वरी : भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी खाली असलेल्या संचालक पदासाठी आज विशेष बैठक घेऊन निवड प्रक्रिया करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी मिळून राष्ट्रवादीचे ईरफान भूरे याना आठ व नऊ अशा सखेने निवडून संचालक पदी निवड करण्यात आली

भिवंडी तालुक्यातील सुपरीचित अशा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाची जागा गेल्या काही महीन्यांपासून रिक्त होती. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विरोधी गटाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या एका रिक्त जागेसाठी आज निवडणूक प्रकिया पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या पदाधिकारी व महापोली येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेऊन इरफान भूरे याना संचालक पदी निवडून देण्यात आले. या प्रसंगी आघाडीचे सर्व संचालक मंडळ तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, शिवसेना तालुकाध्य विश्वास थले, पंडित पाटिल काँग्रेसचे तालुकाध्यश राकेश पाटील, सी एस पाटील, ठाणे जिल्हा परिषद सदस्य किशोर जाधव, महापोली उपसरपंच उबेद हलवे, दादा पटेल, इरफान पटेल, नॉशद पटेल, बिलाल हलवे, मजाज भूरे, सरफराज भूरे, आनिज भूरे, बाजील पटेल, शादाब कोतकर, शाकिब पटेल,रमीज पटेल,दानिश पटेल, हुझेब हलबे, व फराज ठाणवल आदींसह महापोली ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीमुळे ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी भूरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT