मुंबई

कल्याण-डोंबिवली पालिकेला हागणदारीमुक्तीचे मानांकन 

सुचिता करमरकर

कल्याण : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत "हागणदारीमुक्त शहर' योजनेत कल्याण-डोंबिवली महापालिकेला "ओ डी एफ++' हे मानांकन मिळाले आहे. शहरातील शौचालय सुविधा आणि मलप्रक्रिया व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर पालिकेला हे मानांकन मिळाले आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या "क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया' या संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. 

3 आणि 4 ऑक्‍टोबर 2019 रोजी केंद्र सरकारच्या पथकाने पालिका क्षेत्रातील झोपडपट्टीतील तसेच सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण केले. याचबरोबर पालिकेच्या मलप्रक्रिया केंद्राचेही सर्वेक्षण केले. पालिका क्षेत्रात 86 वस्ती शौचालये तसेच 20 सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध आहे. निर्मल योजनेंतर्गत पालिकेने यातील काही शौचालयांचे बांधकाम केले आहे. केंद्रीय पथकाने सर्वेक्षण करत असताना तेथील साफसफाई, त्याचा केला जाणारा वापर याचे प्रामुख्याने निरीक्षण केले. 

त्याचप्रमाणे या शौचालयांमार्फत पालिकेस उत्पन्नाचे साधन उपलब्ध आहे का, याची पाहणीही करण्यात आली. पालिकेच्या बहुतांश शौचालयांमध्ये जाहिरातीसाठीची व्यवस्था उपलब्ध असल्याने पालिकेला या सर्वेक्षणात अधिक गुण मिळाले. पथकाने पालिकेच्या आधारवाडी, बारावे, टिटवाळा येथील मलनिःसारण प्रक्रिया केंद्राचीही पाहणी केली.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड, कार्यकारी अभियंता नवांगुळ, मलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव, घनकचरा व्यवस्थापनाचे सहायक आयुक्त बोराडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक अधिकारी घुटे आणि विलास जोशी यांनी यासाठी प्रयत्न केले होते. 

नागरिकांना आवाहन 
स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. 15 डिसेंबरपासून हे सर्वेक्षण सुरू होणे अपेक्षित आहे. पालिकेने यापूर्वीच काही प्रभागांत ठेकेदारांमार्फत कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचऱ्याच्या गाडीवर "जीपीएस ट्रॅकिंग' यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम यापूर्वी सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी पालिकेच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत सुरू केलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT