पाणजे पाणथळ नसल्याचा कांदळवन समितीचा दावा
पाणजे पाणथळ नसल्याचा कांदळवन समितीचा दावा 
मुंबई

पाणजे पाणथळ नसल्याचा कांदळवन समितीचा दावा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पक्षी अभयारण्याचा दर्जा दिलेला पाणजे परिसर पाणथळ नसल्याचा साक्षात्कार राज्याच्या कांदळवन आणि पाणथळ समितीला झाला आहे. नवी मुंबई उरण परिसरातील पाणथळींबाबत सिडको प्रशासनाविरोधातील तक्रारींबाबत समितीची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत पर्यावर्णीयदृष्ट्या संवेदनशील असलेले पाणजे पाणथळ नसल्याचा दावा या समितीने केला. 

उरण तालुक्‍यातील पाणजे हा २१३ हेक्‍टर जमिनीवर पसरलेला पाणथळी, दलदल, खारफुटी आणि हिरवाईने नटलेला परिसर आहे. या परिसरात ५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आढळत असल्याने पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांसाठीदेखील या परिसराला विशेष महत्त्व आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी सिडकोने पाणजेसह नवी मुंबई रायगड परिसरातील आठ ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून तेथे पक्षी अभ्यासक, स्थानिकांना प्रवेश बंदी केली. त्यामुळे पाणजे पाणथळ बळकावून नष्ट करण्याचा डाव असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. काही पर्यावरणप्रेमींनी यासंदर्भात सिडकोविरोधात राज्याच्या कांदळवन आणि पाणथळ समितीकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींवर सुनावणी घेताना समितीने पाणजे ही पाणथळ नसल्याचे नमूद केले. समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे पाणजे जैवविविधतेने समृद्ध परिसर असला तरी राष्ट्रीय पाणथळ अटलासमध्ये त्याची अधिकृत नोंद नाही, अशी माहिती समितीतील सदस्यांनी दिली. समितीच्या या अजब दाव्यामुळे पर्यावरणप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

पाणजे पक्षी अभयारण्य घोषित करण्याच्या निर्णयाबाबत माझ्याकडे माहिती नाही. पाणजेचा राष्ट्रीय पाणथळ अटलासमध्येही समावेश नाही. त्यामुळे पाणजे पाणथळ म्हणून गृहीत धरलेले नाही. भेंडखलचा मात्र त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे तिथले भराव काढण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. 
- निनू सोमराज, कक्ष आणि सदस्य सचिव, कांदळवन आणि पाणथळ समिती.

राज्याच्या कांदळवन आणि पाणथळ समितीने दिलेल्या सूचनेनुसार भेंडखळमधील भराव लवकरच काढला जाईल. 
- प्रमोद पाटील, क्षेत्रीय अधिकारी, वन आणि पर्यावरण विभाग, सिडको.

पाणजे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे माहीत असतानाही; कांदळवन आणि पाणथळ समितीने पाणजे पाणथळ नसल्याचे म्हणणे हे अजब आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. 
- नंदकुमार पवार, अध्यक्ष, श्री एकविरा प्रतिष्ठान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

SCROLL FOR NEXT