Kidney
Kidney 
मुंबई

मूत्रपिंड प्रत्यारोपणाने जीवदान

सकाळवृत्तसेवा

मुंबई - रक्तगट जुळत नसतानाही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या मुलाला जीवदान मिळाले. या मुलाला वर्षभरापासून कोणताही संसर्ग झालेला नाही. त्याच्या शरीराने नवे मूत्रपिंड स्वीकारले असून, वर्षभरात वजनात १० किलोने वाढ झाली आहे. 

परळ येथील ग्लोबल रुग्णालयात वर्षभरापूर्वी आठ वर्षांचा एक मुलगा मूत्रपिंडाच्या आजाराने दाखल झाला होता. त्याच्या मूत्रपिंडात जन्मत:च दोष होता. वारंवार जंतुसंसर्ग होऊन त्याचे उजवे मूत्रपिंड निकामी झाले होते.

कुपोषणामुळे या मुलाची वाढ खुंटली होती. त्यामुळे त्याच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते. अशा स्थितीत रुग्णाची आई सर्वांत योग्य अवयवदाता मानली जाते; मात्र रक्तगट जुळत नसल्यामुळे त्याला आईचे मूत्रपिंड बसवण्यात मोठी अडचण होती; परंतु या मुलाचे मूत्रपिंड बदलणे अत्यावश्‍यक असल्यामुळे डॉक्‍टरांनी अपवादात्मक स्थितीत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली, अशी माहिती ग्लोबल रुग्णालयाचे नेफ्रोलॉजी विभागाचे संचालक डॉ. भरत शहा यांनी सांगितले. अशाप्रकारच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या शरीराने नवा अवयव स्वीकारणे गरजेचे असते. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर वर्षभरात या मुलाच्या प्रकृतीबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. त्याची उंची आणि वजनही वाढत आहे, असे डॉ. शहा यांनी सांगितले.

मुलगा आणि आई यांचे रक्तगट भिन्न असल्यामुळे मूत्रपिंड स्टेरॉइडचा वापर करावा लागतो. हा मुलगा लहान आणि कुपोषित असल्यामुळे स्टेरॉइडविरहित उपचार करण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. हा अत्यंत दुर्मीळ प्रकार असल्याचा दावाही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT