Railway Konkan
Railway Konkan 
मुंबई

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना खूशखबर

सकाळवृत्तसेवा

उन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या
मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोईसाठी मध्य रेल्वे 60 विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी स्थानकांदरम्यान या रेल्वेगाड्या धावतील.

पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी 6 एप्रिल ते 9 जूनदरम्यान दर शनिवार व रविवारी सकाळी 8.15 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 8 वाजता सावंतवाडीला पोचेल. सावंतवाडी-पनवेल विशेष गाडी 5 एप्रिल ते 8 जूनदरम्यान दर शुक्रवार व शनिवारी रात्री 8.30 वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी 7.20 वाजता पोचेल. या विशेष रेल्वेगाडीच्या एकूण 40 फेऱ्या होणार असून, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

पुणे-सावंतवाडी विशेष गाडी 5 एप्रिल ते 7 जूनदरम्यान दर शुक्रवारी पहाटे 4.55 वाजता सुटून त्याच रात्री 8 वाजता सावंतवाडीत दाखल होईल. सावंतवाडी-पुणे विशेष गाडी 7 एप्रिल ते 9 जूनदरम्यान दर रविवारी रात्री 8.30 वाजता सुटून पुण्यात दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता दाखल होईल. एकूण 20 फेऱ्या होणाऱ्या या विशेष रेल्वेगाडील लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्‍वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.

सोमवारपासून आरक्षण
या दोन्ही विशेष रेल्वेगाड्यांना एसी चेअर कारचे दोन, द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था असलेले 11 डबे जोडले जातील. या विशेष गाड्यांचे आरक्षण 25 मार्चपासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT