Eknath Shinde
Eknath Shinde Sakal
मुंबई

कुशवली धरण मोबदला घोटाळा प्रकरण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - पीक कर्जापोटी शेतकऱ्यांना देण्यात येणारा व्याज परतावा मिळालाच पाहिजे त्या दृष्टीने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे त्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असल्याचे विधान नगर विकास मंत्री व पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे केले.

डोंबिवली जवळील कोळेगाव येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरनाच्या कामाच्या भूमिपूजनासाठी कोरेगाव येथे आले होते यावेळी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता, केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेतला, हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे याविषयी त्यांनी वरील विधान केले.

कुशवली धरण मोबदला घोटाळा प्रकरण - योग्य ती कारवाई होणार

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघु पाटबंधारे विभागाचा धरण प्रकल्प उभा राहणार आहे. या धरणाच्या भूसंपादन मोबदला वितरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत प्रकरण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे मंत्री शिंदे म्हणाले.

कल्याण बीएसयुपी , म्हाडाच्या घरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकर मार्ग काढणार

खोणी येथील म्हाडाच्या लाभार्थ्यांना शेवटचा 10 टक्क्यांचा हफ्ता माफ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले होते याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. म्हाडाची , बीएसयुपी घरे अशा प्रलंबित विषयावर शासन स्तरावर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल. कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे देखील युद्ध पातळीवर सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT