Landslide accident
Landslide accident esakal
मुंबई

मुंबई - चेंबुरमध्ये दरड कोसळली, दोनजण गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील चेंबूरमध्ये झोपडीवर दरड कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले

आज पहाटे चारच्या सुमारास मुंबईतील चेंबूरमध्ये झोपडीवर दरड कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत झोपडीतील अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. चेंबुरच्या न्यू भारतनगरमध्ये सकाळी ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Landslide accident in chambur)

मिळालेली माहिती अशी, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चेंबुरमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. चेंबुरमधील झोपडीवर दरड कोसळलेल्या घटनेत दोन भाऊ जखमी झाले आहेत. चेंबुर येथील ही झोपडपट्टी डोंगरी पट्ट्यात भागात येत. याआधीही या विभागात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडून गेल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात म्हणून याअगोदरही प्रशासनाने नागरिकांना येथून स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आता मुंबईमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनेत दरड कोसळल्यानंतर एक मोठा दगड प्रजापती कुटुंबीयांच्या घरात घुसला. यात हे दोघे भाऊ जखमी झाले असून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर आता प्रशासन कोणता निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT