मुंबई

लॉकडाऊनमध्ये भारतात प्रथमच ‘आयव्हीएफ’ तंत्राने म्हशींच्या पारडांचा जन्म; जुळी पारडे जन्माला येण्याची भारतातील पहिलीच घटना

भाग्यश्री भुवड

मुंबई -  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात राहु या गावाजवळ असलेल्या म्हशींच्या मोठ्या फार्ममध्ये म्हशींची पारडे ‘आयव्हीएफ’ पद्धतीने जन्माला आली आहेत. या पद्धतीने पारडे जन्माला घालण्याचा हा असा पहिलाच उपक्रम ‘जेकेबोवाजेनिक्स’ या ‘जेके ट्रस्ट’मधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने राबवण्यात आला. ही संस्था पशुसंवर्धन क्षेत्रात काम करते. सध्या ती देशभरात गुरे आणि म्हशी प्रजनन विकास कार्यक्रम आयोजित करत आहे.

पुण्याजवळील ‘सोनवणे बफेलो फार्म’मध्ये 4 म्हशींपासून या 5 आयव्हीएफ पारडांचा जन्म झाला. यात एका जुळ्या पारडांचाही समावेश आहे. भारतात आयव्हीएफ तंत्रामार्फत जुळी पारडे जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. ही पारडे मुऱ्हा जातीची आहेत. म्हशींमधील जगातील नामांकित जातींपैकी ही एक जात आहे.

याविषयी रेमंड समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी सांगितले की, हा अशा प्रकारचा एकमेव उपक्रम असून यातून देशातील दुग्ध उत्पादन वाढण्यास मोठी मदत होऊ शकेल. आजच्या संदर्भात आपली देशी जनावरे आणि म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या दुधात आजारांशी लढण्यासाठी उच्च पौष्टिक मूल्ये असतात. भारतात दुग्धजन्य उत्पादनांमध्ये वाढ झाल्याने खेड्यांमध्ये तळागाळात अधिक प्रगती होऊ शकते.”

दुध उत्पादनाला होणार मोठा फायदा- 

जेके ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्याम झंवर म्हणाले, “भारतामध्ये 10 कोटी 90 लाख म्हशी आहेत. ही त्यांची संख्या जगातील म्हशींच्या 56 टक्के इतकी आहे. म्हशींची मुऱ्हा ही भारतीय जात जगातील नामांकीत जातींपैकी एक अशी मानली जाते. ‘असिस्टिड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’ (एआरटी) वापरून भारतात अनुवांशिकदृष्ट्या उत्कृष्ट म्हशींची पैदास मोठ्या प्रमाणात करता येते, हे आता सिद्ध झाले आहे. परिणामी दुधाचे उत्पादन आता जास्त करता येईल. 

काय आहे इतिहास ? 

भारतात दुभती जनावरे व म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात करण्याचे पूरक तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या उद्दिष्टाने ‘जेकेबोवाजेनिक्स’ची स्थापना ‘जेके ट्रस्ट’ने 2016 मध्ये केली. महाराष्ट्रातील पुण्याजवळील ‘कॅटल ईटी-आयव्हीएफ लॅब’मध्ये यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर, भारतीय शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेने प्रथमच चार ‘मोबाइल ईटी-आयव्हीएफ व्हॅन’ स्थापित केल्या. या व्हॅन्स शेतकऱ्यांच्या दारात प्रत्यक्ष नेण्यात येतात. पुण्याजवळील ‘जेकेबोवाजेनिक्स’ची आयव्हीएफ सुविधा आणि गुरे संवर्धन फार्म यांना भारत सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाची मंजुरी आहे. भारताच्या विविध राज्यांतील भ्रूण हस्तांतरणाचे (ईटी) काम करणाऱ्या प्रयोगशाळांमधील अधिकाऱ्यांना आयव्हीएफ प्रशिक्षण देण्यासही ‘जेकेबोवाजेनिक्स’ला मान्यता मिळालेली आहे.

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT