lok sabha election 2nd phase voting congress leadership
lok sabha election 2nd phase voting congress leadership Sakal
मुंबई

नेतृत्वाची पोकळी भरण्याचे काँग्रेसपुढे आव्हान; प्रभावी नेतृत्वाअभावीच घ्यावी लागतेय दुय्यम भूमिका

सकाळ वृत्तसेवा

- विजय चोरमारे

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडत असताना काँग्रेस पक्षातील नेतृत्वाचा मुद्दा समोर येत आहे. सर्वमान्य नेता नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या मोठ्या प्रचारसभांमधील काँग्रेस नेतृत्वाची पोकळी ठळकपणे जाणवते.

त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या बळावरच काँग्रेसला आपली नौका पार न्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी नेतृत्वाची पोकळी भरण्याचे आव्हान काँग्रेस पक्षापुढे असेल.

पहिल्या टप्प्यानंतर प्रचाराने वेग घेतला आणि दुसरा टप्पाही संपला आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेले महाराष्ट्र हे दुस-या क्रमांकाचे राज्य असल्यामुळे भाजपने त्याकडे अधिक लक्ष दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यात एकच सभा झाली आणि दुस-या टप्प्यात अमरावती आणि सोलापूर अशा दोन सभा झाल्या.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही महाराष्ट्रात म्हणावी तेवढी उपस्थिती जाणवत नाही. खर्गे हे मराठी बोलणारे नेते असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांचा चांगला प्रभाव पडू शकतो, परंतु काँग्रेसकडून त्याचा लाभ उठवला जाताना दिसत नाही.

काँग्रेसला आतापर्यंत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख असे राज्यपातळीवर प्रभाव असलेले नेते लाभले. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण यांना मोठा जनाधार नसला तरी त्यांनी सत्तेच्या बळावर आपला प्रभाव निर्माण केला. विलासराव देशमुख यांच्यापर्यंत काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्व होते.

अशोक चव्हाण हे देशमुख यांच्या उंचीला पोहोचू शकले नसले तरी तुलनेने त्यांनी संघटनेवर उत्तम पकड मिळवली होती. त्यांच्यानंतर निर्माण झालेली पोकळी काँग्रेसला भरून काढता आलेली नाही.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे धडाडी असली तरी सर्वांना सोबत घेण्यात त्यांना यश आले नाही. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते असले आणि त्यांचा आवाका मोठा असला तरी त्यांनाही जिल्ह्याच्या बाहेर प्रभाव निर्माण करता आला नाही.

महाविकास आघाडीच्यावतीने ज्या मोठ्या संयुक्त सभा होत आहेत, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेवढ्या तोलामोलाचा नेता काँग्रेसकडे दिसत नाही.

त्यामुळे ठाकरे-पवार यांच्यासोबत काँग्रेसचे नेते म्हणून कधी मुकुल वासनिक तर कधी बाळासाहेब थोरात उपस्थित असतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रचारात सक्रीय असले तरी महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभांमध्ये अभावानेच दिसतात.

पवार आणि ठाकरे यांच्यासोबत मंचावर वजनदारपणे वावरू शकतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते काँग्रेसकडे असले तरी तेही या सभांमधून दिसत नाहीत. एकूणच प्रचाराच्या पातळीवर काँग्रेसमधील समन्वयाचा अभावही यामधून दिसून येतो.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर मतदारसंघात अडकून पडले आहेत. राज्यपातळीवरील नेतृत्वाची पोकळी जाणवत असताना प्रादेशिक पातळीवरील काँग्रेसचे नेते प्रभावीपणे काम करीत असल्याचे सुखद चित्रही दुसरीकडे दिसते.

कोल्हापूरमध्ये सतेज पाटील, लातूरमध्ये अमित देशमुख, अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर, धुळ्यामध्ये कुणाल पाटील, विदर्भात विजय वडेट्टीवार, मुंबईत वर्षा गायकवाड असे नेते काँग्रेसचा किल्ला लढवत आहेत. हीच काँग्रेससाठी भविष्यातील आशादायक गोष्ट मानली जाते.

ठाकरेंनी घेतला फायदा

लोकसभेच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळाले, त्याचे समर्थन काँग्रेसचे राज्यातील नेते वेगवेगळ्या पद्धतीने करीत असले तरी प्रभावी नेतृत्व नसल्यामुळेच काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागली. हक्काची सांगलीची जागा सोडावी लागली, असे काँग्रेसचे नेते-कार्यकर्तेही खासगीत बोलतात. काँग्रेसमधील नेतृत्वाच्या पोकळीचा फायदा उठवत उद्धव ठाकरे यांनी जास्तीच्या जागा पदरात पाडून घेतल्या, हे नेतृत्वाचे अपयश असल्याचे मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT