Ashok-Chavan
Ashok-Chavan 
मुंबई

Loksabha 2019 : पळ काढणारे चौकीदार नव्हे, तर चोर - अशोक चव्हाण

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘‘भाजप देशपातळीवर ‘मैं भी चौकीदार’ अभियान चालवत आहे. परंतु कोणत्याही आरोपाला संवेदनशीलतेने उत्तर देण्याचे आत्मबळ भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेले नाही. भ्रष्टाचार आणि नैतिकतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर न देता भारतीय जनता पक्ष पळ काढत आहे. पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात,’’ अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

चव्हाण म्हणाले, ‘‘ दिलीप कांबळे या मंत्र्यांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. लाचखोरीबद्दल त्यांची हकालपट्टी करण्याचे सोडाच, परंतु त्याची दखल घेण्याची नैतिकताही भाजपमध्ये राहिलेली नाही.’’

‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या चौकशीतील दिरंगाई व अकार्यक्षमतेबद्दल उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणे तर सोडाच, परंतु त्याला उत्तर देण्याचीही हिंमत सरकारमध्ये नाही’’.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT