मुंबई

कीर्तिकरांना पर्याय पुत्राचा; अमोल कीर्तिकर लोकसभेचे उमेदवार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी त्यांचा पुत्र अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. या जागेवर माजी महापौर सुनील प्रभू यांचाही विचार झाला होता.

गजानन कीर्तिकर यांना प्रकृतीच्या कारणामुळे लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यांच्याऐवजी माजी महापौर सुनील प्रभू यांचे नाव पुढे आले होते; मात्र प्रभू यांना दिल्लीत जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर यांचे नाव पुढे आले आहे. अमोल कीर्तिकर हे युवा सेनेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूकही लढवली होती. तसेच ते वायव्य मतदारसंघातही कार्यरत असतात. युवा सेनेचे पदाधिकारी असल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडूनही त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील, असे समजते.

दिंडोशी मतदारसंघ वगळून बाजूच्या जोगेश्‍वरी मतदारसंघातही अमोल यांना जागा मिळणार नाही. कांदिवली, चारकोप हे मतदारसंघ भाजपकडे असल्याने त्यांना विधानसभेसाठी जागा राहिलेली नाही. सध्या युतीही झालेली असल्याने शिवसेनेसाठी हा मतदारसंघ फारसा अवघड राहिलेला नाही. त्यामुळे अमोल कीर्तिकर थेट लोकसभा लढण्याची ‘रिस्क’ घेऊ शकतात.

आमदारकीसाठी दिंडोशी मिळणे कठीण!
अमोल कीर्तिकर यांना दिंडोशी मतदारसंघातून विधानसभा लढवायची होती; मात्र सलग दोन वेळा प्रभू या मतदारसंघातून लढले आहेत. तसेच सध्या ते आमदारही आहेत. त्यामुळे ते ही जागा सोडणे शक्‍य नाही.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT