Raj-Thackeray
Raj-Thackeray 
मुंबई

Loksabha 2019 : राज यांच्या सभांसाठी माहिती जमा करण्याच्या सूचना

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज ठाकरे यांच्या सभांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच केंद्र आणि राज्यातील सरकारच्या विरोधातील माहिती इंटरनेटवरून जमा करण्याच्या सूचना मनसेच्या नेत्यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांच्या मुंबईत दोन सभा झाल्या. यामध्ये राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते आणि त्यांच्या सरकारवर चौफेर टीका केली होती. या वेळी त्यांनी मोदी यांच्या सभेतील भाषणांच्या क्‍लिप तसेच इंटरनेटवरील आवश्‍यक तपशील स्क्रीनवर दाखवत भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावरून लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात पॉवर पॉइंट प्रेझंटेशन करणारे राज ठाकरे देशातील एकमेव नेते ठरल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणूक लढविणार नाही. मात्र, मोदी आणि अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी प्रचार सभा घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासाठी मनसैनिकांनी आवश्‍यक ती माहिती इंटरनेटवरून जमा करण्याच्या सूचना नेत्यांनी केल्या आहेत. याव्यतिरिक्‍त कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याची सूचना मनसे नेते अनिल शिदोरे यांनी ट्‌विटरवरून केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT