Ramdas-Athawale
Ramdas-Athawale 
मुंबई

Loksabha 2019 : आठवले यांची झोळी रिकामीच

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्‍याची हाक देत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची झोळी अद्याप रिकामीच आहे. त्यांनी मागणी केलेल्या मुंबईतील दोन्ही लोकसभा जागांवर शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान खासदारांनी प्रचार सुरू केला आहे. शिवसेना-भाजप यांनी एकत्र प्रचाराच्या तारखाही ठरवल्या आहेत.

रामदास आठवले यांनी सुरवातीला शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची मागणी केली होती. शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दक्षिण मध्य मुंबई किंवा भाजपच्या ईशान्य मुंबई या मतदारसंघांचा पर्याय दिला; परंतु शिवसेना आणि भाजपने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवाळे आणि ईशान्य मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना प्रचार सुरू केला आहे. पक्षांकडून सूचना मिळाल्याखेरीज या दोन्ही खासदारांना प्रचार सुरू करता आला नसता. त्यामुळे या दोन्हींपैकी एकही जागा आठवले यांना मिळणे कठीण मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT