Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागला आहे. इंदौर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

एकीकडे निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना काँग्रेसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंदौर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्जाची मुदत संपल्याने या जागेवरील काँग्रेसची उमेदवारी आता संपुष्टात आली आहे. काँग्रेसला धक्का देत अक्षय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बम यांच्यासह भाजपचे विद्यमान आमदार रमेश मंडोला यांनी डीसी कार्यालयात पोहोचून उमेदवारी अर्ज मागे घेतला. बम यांचा हा निर्णय काँग्रेससाठी अतिशय धक्कादायक आहे. अद्याप पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले की, इंदौरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Lok Sabha Election
PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी सोशल मीडियावर अक्षयसोबतचा सेल्फी पोस्ट करून भाजपमध्ये त्याचे स्वागत केले आहे. विजयवर्गीय यांनी लिहिले, 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी, मुख्यमंत्री मोहन यादव जी आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा जी यांच्या नेतृत्वाखाली इंदौरमधील काँग्रेस लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचे भाजपमध्ये स्वागत आहे.' या सेल्फीमध्ये विजयवर्गीय आणि अक्षय बम एका कारमध्ये एकत्र जाताना दिसत आहेत.

Lok Sabha Election
स्वातंत्र्यानंतर सोलापुरात आले 9 पंतप्रधान! नरेंद्र मोदी 10 वर्षांत पाचव्यांदा सोलापुरात! तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त येणारे मोदी पहिलेच पंतप्रधान

अक्षय कांती यांच्याआधी सुरतमध्येही काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला होता. नंतर इतर 8 उमेदवारांनी आपली नावे मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. 24 एप्रिल रोजीच मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी अक्षय कांती बम यांच्या नामांकनाच्या दिवशी रॅली काढली होती.

अक्षय कांती बम, मिनी मुंबई म्हणजेच मध्य प्रदेशातील इंदौर येथून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 24 एप्रिल रोजी उमेदवारी दाखल केली होती.

Lok Sabha Election
मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

काय आहे सुरतचे प्रकरण?

नुकतेच गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे. या जागेवरील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज एक दिवस अगोदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला होता. त्यांच्या प्रस्तावकांच्या सह्यांमध्ये अनियमितता असल्याचे कारण देत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.

काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज रद्द झाल्यानंतर उर्वरित 8 उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अशा स्थितीत भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाने त्यांना विजयाचे प्रमाणपत्रही दिले.

Lok Sabha Election
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com