Thane
Thane 
मुंबई

Loksabha 2019 : ठाणे मतदारसंघ राज्यात सर्वांत मोठा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या संदर्भात प्रशासन आणि पक्षांच्या पातळीवर प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू असताना राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी सर्वांत मोठा मतदारसंघ ठाणे आणि लहान मतदारसंघ दक्षिण-मध्य मुंबई असल्याने त्या दृष्टीने राजकीय पक्ष आणि प्रशासन अशा दोन्ही पातळीवर निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

यापूर्वी राज्यातील अनेक मतदासंघांत मतदारसंख्या कमी-अधिक प्रमाणात होती. म्हणजेच काही मतदारसंघात अगदी कमी आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार होते. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने २००९ मध्ये सर्व मतदारसंघांची फेरचना केली. या फेरचनेच्या आधारे सध्याच्या निवडणुका होत आहेत. मतदारसंख्येच्या पातळीवर विचार केला असता, राज्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असून, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात सर्वांत कमी मतदार आहेत. ठाण्यापाठोपाठ राज्यातील मावळ, नागपूर, शिरूर, बारामती, बीड, आणि पुणे मतदारसंघात मतदारसंख्या अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT