central railway
central railway sakal media
मुंबई

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकल प्रवासापासून वंचित, वाचा सविस्तर

कुलदीप घायवट

मुंबई : राज्य सरकारच्या (Maharashtra government) सूचनेप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना (essential services employees) लोकल प्रवासात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांना तिकिट, मासिक पास मिळणे (ticket- pass) अवघड झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकल प्रवासापासून वंचित झाले आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या (central and western railway) महाव्यवस्थापकांशी (manager) पत्रव्यवहार केला आहे. (Maharashtra government-essential services employees-ticket-pass-railway-manager-nss91)

आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून जाहिर केलेल्या 24 जून 2021 च्या परिपत्रकानुुसार राज्य आणि केंद्रामधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकावर राज्य आणि केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना लोकलचे तिकिट किंवा मासिक पास मिळत नाही. वैध ओळखपत्र दाखवून सुद्धा तिकिट नाकारले जात आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थपकांनी यामध्ये लक्ष घाऊन राज्य आणि केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांनी वैध ओळखपत्र दाखविल्यास त्यांना लोकल तिकिट किंवा मासिक पास द्यावा, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र दिले आहे.

वैध शासकीय ओळखपत्र असलेल्या सर्व प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यचाी परवानगी आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. राज्य सरकारने ज्या कॅटेगिरीमधील प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी तिकिट आणि मासिक पास देण्यात येत आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT