Maharashtra Politics Sanjay raut on rebel mla of shiv sena who join mns mumbai
Maharashtra Politics Sanjay raut on rebel mla of shiv sena who join mns mumbai  e sakal
मुंबई

'ही तर ऐतिहासिक घटना असेल'; बंडखोरांच्या ‘मनसे’ प्रवेशाबद्दल राऊतांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना आमदारकी वाचवायची असेल तर त्यांना कोणत्याही पक्षात जाता येईल. मनसेमध्ये बंडखोर आमदार गेल्याने त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक घटना असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही.

अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. बंडखोरांमुळे मनसेला पर्यायाने राज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक गोष्ट असेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT