मुंबई

राज्यात महायुतीला 220 हुन अधिक जागांवर विजय मिळेल : खासदार राहुल शेवाळे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, मानखुर्द येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शेवाळे यांच्या पत्नी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे यांनीही मतदान केले.

"राज्यात शिवसेना-भाजप महायुतीला 220 हुन अधिक जागांवर विजय मिळेल आणि वरळी विधानसभा मतदारसंघात, शिवसेना नेते-युवसेनापप्रमुख आदित्य ठाकरे हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील" असा विश्वास यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला. 

खासदार शेवाळे यांनी ज्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात मतदान केले, त्याठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार तुकाराम काते विजयी होतील, असा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला. तसेच, आज लोकशाहीचा मोठा उत्सव असून या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन शेवाळे यांनी जनतेला केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT