indigo plane esakal
मुंबई

Plane : दोन विमानांचा मोठा अपघात टळला; इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बंद

मदुराई ते मुंबई आणि कोलकाता ते बंगळुरू विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मदुराई ते मुंबई आणि कोलकाता ते बंगळुरू विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोन्ही विमान इंडिगो कंपनीचे आहे. मात्र, सुदैवाने वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे विमानाला मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. दोन्हीं विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमान ए ३२१ (व्हीटी-आययूजे) मंगळवारी मदुराईहून मुंबईला येते होते. या विमानाच्या एका इंजिनमध्ये उच्च दाबाचे कंपन दिसून आले. इंजिन ऑइल प्रेशरबाबत इशारा मिळताच तात्काळ इंजिन -१ बंद करण्यात आले.

त्यानंतर वैमानिकाने विमानाच्या लँडिंगसाठी मुंबई विमातळावरील एटीसीशी संपर्क साधला. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने तात्काळ रनवे उपलब्ध करून देत विमानाची सुरक्षित लँडिंग करण्यात आले. तर दुसरी घटना कोलकाता-बंगळुरू विमानाचे प्रॅट अँड व्हिटनी इंजिन क्रमांक २ तांत्रिक समस्येमुळे हवेतच बंद पडले.

त्यालाही विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती नागरिक विमान वाहतूक महासंचालनालयांच्या (डीजीसीए) एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इंडिगोच्या विमानाची तपासणी होणार

पी अँड डब्लू इंजिनमध्ये समस्या इंडिगो आणि गो फस्ट एअरलाइन्सच्या सुमारे ४० विमानांमध्ये ही समस्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे या घटनेची नागरिक विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतली आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन इंडिगो ताफ्यातील विमानाची तपासणी आता नागरिक विमान वाहतूक महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT